जि.प.उपअभियंत्याच्या लेखी आश्वासनानंतर सविता आकुसकर यांचे उपोषण मागे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 29 जुलाई 2018

जि.प.उपअभियंत्याच्या लेखी आश्वासनानंतर सविता आकुसकर यांचे उपोषण मागे.



केज: केज : तालुक्यातील आडस येथे गेल्या 9 दिवसापासून सुरू असलेले सामाजिक कार्यकर्त्या सविता आकुसकर यांचे उपोषण अखेर शनिवारी दि.28 रोजी जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता पालवे व उपअभियंता बी.बी.खेडकर यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

तालुक्यातील आडस येथील जीर्ण झालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीस पाडण्यात यावे, बोगस किचन शेडची चौकशी व्हावी व नवीन किचन पुन्हा बांधून देण्यात यावे या मागण्यांसाठी गेल्या 9 दिवसापासून उपोषण सुरू होते. दरम्यान, दोनवेळा उपोषणकर्त्या सविता आकुसकर यांची प्रकृती बिघडली, तरी त्यांनी प्रकृती सुधारल्यानंतर उपोषण कायम सुरू ठेवले. उपोषणाला राम माने यांनी पाठिंबा दिला होता. उपोषण सोडताना शिवसेनेचे विभागप्रमुख विकास काशीद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें