मोरेगांव येथील जुगार आड्यावर पोलीसांची धाड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 24 जुलाई 2018

मोरेगांव येथील जुगार आड्यावर पोलीसांची धाड.


◾राष्ट्रवादीचे आ. भांबळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या  तक्रारी नंतर पोलीसाची कारवाई. 

◾३३ आरोपींकडून जुगार साहित्यासह १लाख ७६ हजार जप्त.


सेलू: प्रतिनिधी.समशेर खान.

  सेलू तालुक्यातील मोरेगांव येथील एका जुगार आड्यावर परभणी येथील पोलीस पथकाने धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह ३३ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून  जुगार साहित्यसह तब्बल १लाख  ७६ हजार रूपये जप्त केल्याची खळबळ उडविणारी   घटना दि.२३ जुलै रोजी दुपारी ५:४० च्या सुमारास घडली. नागपूर अधिवेशन प्रसंगी आपल्या मतदार संघात चालणारे विविध प्रकारचे अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. विजय भांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या कडे केली होती. त्या नंतरचं पोलीसांनी हि कारवाई केली असावी अशी चर्चा घटने नंतर सेलूसह तालुक्यातील होत आहे.
सेलू तालुक्यातील          मोरेगांव  येथे जुगार चालू असल्याची माहिती अतिरीक्त पोलीस अधिक्षक विश्वपानसरे यांना मिळाली होती.त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी उस्मान शेख ,पोउपनि शिशिरकुमार देशमुख व  इतर  ७ पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने  मोरेगांव येथे पांदन रस्त्यावरील एका बंद  खोलीत जुगार खेळणा-या शेख सिकंदर शेख पाशा,भाऊराव बोबडे,मनोज जैस्वाल, आक्रमखान मुजाहिद्दखान ,रवि अंभुरे,बाबुराव दळवी, अंगद राखुंडे,भारत राठोड,राजू राठोड ,भानुदास शिंदे, मजहर खान पठाण,संतोष चव्हाण, साहेबराव गाडेकर,दत्ता बोराडे,गजानन उफाडे,कैलास उघडे,विकास परदेशी, महादु अंबटवार,दमोधर सावंत ,रामेश्वर वाव्हळ ,अंकुश पौळ, श्रीराम कोथळे, अनिस कुरेशी, विठ्ठल चव्हाण ,अंजीराम काळे, अरेफ पठाण, अशोक नागरे, विश्वंभर आप्पा महाजन, विशाल पांचाळ, पांडुरंग बुरे, अक्षय इघवे, पंडित कांबळे या
आरोपींना ताब्यात घेतले .त्यांच्याजवळील जुगार साहित्यासह १ लाख ७६ हजार रक्कम जप्त केली.या ३३ आरोपींना सेलू पोलीस ठाण्यात आणून सोमवारी रात्री १० वा.त्यांच्याविरुद्ध तक्रारदार चंद्रशेखर भास्करराव बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलिस ठाण्यात कलम 4 5 मुंबई जुगार कायदा याअंतर्गत
 गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर हे करत आहेत. परभणीतील पथकाकडून सर्वात मोठी कार्यवाही करण्यात  आल्यामुळे मोठी खळबळ उडाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. विजय भांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या कडे तक्रार केल्या नंतर कारवाई करण्यात आल्याची चर्चा होत आहे.

◾शहरातील जुगार आड्डाना अभय कोणाचे ?

तालुक्यातील विविध ठिकाणी चालणा-या अवैद्य धंद्याची मालिकाच पोलीस अधिकारी यांच्या कडे केली तरी. हे धंदे मात्र बंद होत नव्हते. ग्रामीण भागा प्रमाणे शहरातील चालणा-या जुगार अड्डा कडे तर आ. भांबळे यांनी तक्रार करूनही कारवाई होत नाही.  मग या जुगार अड्ड्यास अभय तरी कोणाचे आहे. असा प्रश्न सेलूकरांना पडला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें