सेलुत कडकडीत बंदला समिश्र प्रतिसाद. ◆अनुचित घटना नाही. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 24 जुलाई 2018

सेलुत कडकडीत बंदला समिश्र प्रतिसाद. ◆अनुचित घटना नाही.


समशेर खान.
सेलु(प्रतिनिधि):सकल मराठा समाजाच्या वतिने आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती त्यास शहरातील अस्थापने बंद करुन अंदोलनास पाठिंबा देण्यात आला. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी अस्थापने बंद होती. मंगळवार 24 रोजी शहरातील अस्थापने बंद ठेवुन सकल मराठा समाजाच्या अंदोलनास व्यापारी वर्गांनी पाठिंबा दर्शवला. शहरातील व्यापारी अस्थापने सकाळ पासुनच बंद होती.सकल मराठा समाजाच्या आरक्षणासह इतरही मागण्यासंदर्भात मागील काही दिवसापासुन सुरु असलेल्या अंदोलनास शासनस्तरावरुन कुठलाही प्रतिसाद मिळत नाही यामुळे सकल मराठा समाजाच्यावतिने महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती. तसेच हे अंदोलन अधिक तिव्र करण्यात येत आहे.शहरात सकाळी 8 वाजल्यापासुनच व्यापा-यांनी स्वयस्फुर्तीने आपली अस्थापने बंद ठेवली होती. चुकुन एक दुसरी दुकान सुरु असल्यास सकल मराठा समाजाच्या युवकांनी रस्त्यावर उतरुन सदरिल अस्थापने बंद करण्याचे अवाहन केले व तात्काळ दुकाने बंद करण्यात आली. तसेच शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी देण्यात आली असल्याने शहरात बंद दरम्यान शुकशुकाट होता. सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने बंद असल्याने शहरात बंद कडकडीत पाळण्यात आला. तर तालुक्यातील मोरेगाव येथेही सकाळपासुन कडकडीत बंद पाळण्यात आला होता. व्यावसायिकांनी हाँटेल, दुकान बंद करुन अंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला होता. बंद दरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडु नये यामुळे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकल मराठा समाजाच्या वतिने मागण्याचे  निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. शहारात बंद करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या युवकांचा जमाव अवाहन करत रस्तावरुन फिरत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें