शिर्डी प्रतिनिधी.( राजेंद्र दुनबळे)
शिर्डी येथे एकदिवसीय भारतीय (राष्ट्रवादी पेन्शन ) संघटनाचे अधिवेशन नुकतेच शिर्डी येथे संपन्न झाले या प्रसंगी नऊ राज्यातुन अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यात महाराष्ट्रसह दिल्ली.आंध्रप्रदेश.यु.पी.गोवा.झारखंड.हरीयाणा.पंजाब.येथिल पेन्शन धारक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यावरांच्या हस्ते साईबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अधिवेशनास सुरवात केली या वेळी बी.डी.एल.श्रीवास्तव दिल्ली.सीताराम कौशल विदिशा.
दिलशेर यादव.अरूण कुमार. शुक्ला.वी.एस.यादव.एस पी कुलकर्णी.सतीश चन्द्र राय.
एन.एस.लम्बा.अशोक सांवला. एन एस धामी.जे पी राय. गुरूदास बी गवास.बच्चा राव एम.एच प्यारे.आदी उपस्थित होते.राष्ट्रीय संयोजक व्ही एस.यादव.आपल्या भाषणात म्हणाले की लोकप्रतिनिधी सरकारने(आमदार.खासदार) यांना पेन्शन योजना सुरू केली असुन परंतु त्यांना ट्याक्स लागत नाही परंतु सरकारी कर्मचारी यांना मात्र आपला ट्याक्स द्यावा लागतो पेन्शनसाठी कोणतेही अंदोलन झाले नाही पेन्शन बाबद लोकांन मध्ये जनजागृती निर्माण करुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु तीस ते पस्तीस वर्षे सेवा करणाऱ्या कर्मचारी यांच्या पगारातुन ट्याक्स द्यावा लागतो सेवा निवृत्ती नंतर पि.एफ.भविष्य निर्वाह निधी या साठी वाट पहावी लागती या दरम्यान कर्मचारी तब्येत ठिक नसल्याने किंवा आजारी असल्याने परीवाराला पैशाची गरज असते या साठी लवकरच भारतीय पेन्शन मंचकडुन अठरा राज्यातुन या संदर्भात मानसे जोडली जात आहे.प्रत्येक राज्यात जाऊन पेन्शन धारकाचे संघटन करुन यांच्या समस्या व मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार असल्याचे यादव यांनी सांगितले

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें