सिल्लोड (प्रतिनिधी) दि 23
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळविणारच" अशा सिंहगर्जनेने ब्रिटीशांविरूद्धच्या स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. सोमसिंग चव्हाण ,नगरसेवक रईस पठाण,माजीनगरसेवक सलिम हुसैनयांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सत्तार हुसेन,अमित आरके,राजू साठे,शेरखा पठाण, सखाराम अहिरे,बाला राठोड,आनंदा चव्हाण,शेख शाहेर,कारभारी दुधे, राजेश्वर आरके, भिमराव चव्हाण,शेख एजाज,रामदास हसे,अफजल बेग, भाईदास पवार,शेख कलिम, रवि आरके, फईम पठाण,आदिंसह पदाधिकारी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें