संभाजी ब्रिगेडच्या वतीने बारामती कृषी अभ्यास दौऱ्याचे आयोजन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 11 जुलाई 2018

संभाजी ब्रिगेडच्या वतीने बारामती कृषी अभ्यास दौऱ्याचे आयोजन.



सेलू प्रतिनिधी
सेलू :- मराठवाडा विदर्भातील युवकांना आधुनिक शेतीचा अभ्यास करण्यासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या वतीने बारामती येथे दोनदिवसिय कृषी व उद्योग अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष छगन शेरे यांनी दिली.
मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्याना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेती,उद्योग,व्यवसाय या विषयावरील अभ्यास दौर्‍याचे आयोजन संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आलेले आहे.
बारामती येथे दिनांक २० व २१ जुलै २०१८ या दोन दिवसीय अभ्यास दौर्‍यामध्ये कृषी विज्ञान केंद्र पाहणी व तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.यामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे संस्थापक राजेंद्रदादा अप्पासाहेब पवार हे स्वत: मार्गदर्शन करणार आहेत.तसेच,संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड हे ही या प्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत.त्यानंतर उद्योग व्यवसाय संदर्भात बी.व्ही.जी ग्रुपचे चेअरमन हणुमंतराव गायकवाड व रोहितदादा पवार हे मार्गदर्शन करणार आहेत.या प्रसंगी बारामतीमधील यशस्वी उद्योजकांशी चर्चा सञ संपन्न होणार आहे.यामध्ये उद्योजक रविंद्र काळे व राजेंद्र इंगवले हे सहभागी होणार आहेत.राञी बारामती मधील प्रचंड लोकप्रिय व विनोदी पथनाट्याचे सादरीकरण होणार आहे.दुसर्‍या दिवशी शरदचंद्रजी पवार वास्तु संग्राहलय व विद्या प्रतिष्ठानला भेट देण्यात येणार असुन याप्रसंगी सौ.सुनेत्रा पवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.तसेच डायनामिक्स कंपनी,हायटेक टेक्सटाईल पार्क भेट व व्यवसाय मार्गदर्शन होणार आहे.त्याचबरोबर रिअर डेअरी भेटीचा ही सदर अभ्यास दौर्‍यामध्ये समावेश असून
सदर दौर्‍यामध्ये संभाजी ब्रिगेड पदाधिकार्‍यांना प्राधान्यक्रमाने प्रवेश देण्यात येईल व उर्वरित जागांचा विचार करण्यात येईल. नाव नोंदणीसाठी प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

1 टिप्पणी:

  1. छान उपक्रम राबवतात या मुळे आपल्या भागातील शेतकरी शेती विषयक माहिती घेऊन आपल्या भागाचा विकास करतील
    अशी अपेक्षा आहे

    जवाब देंहटाएं