आ.मोहनभाऊ फड यांच्या हस्ते मांडाखळी रस्त्यावर वृक्ष लागवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 12 जुलाई 2018

आ.मोहनभाऊ फड यांच्या हस्ते मांडाखळी रस्त्यावर वृक्ष लागवड.


मानवत/ मुस्तखीम बेलदार
 दि.१२: परभणी तालुक्यातील  मांडाखळी ते इंद्रायणी माळ या रस्त्यावर दुतर्फा वृक्ष लागवड कार्यक्रमा चा शुभारंभ आ.मोहनभाऊ फड यांच्या हस्ते वृक्ष लागवड कार्यक्रम  आज दि.१२ जुलैरोजी करण्यात आला.
        या कार्यक्रमासाठी सर्व श्री सुरेश भुमरे,दत्ता जाधव,बाबुराव गोरे,सखाराम शेळके,नंदूमामा पोहणेरकर  यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना त्यांच्या खाजगी क्षेत्रावर वृक्ष लागवड करून संगोपन करणे सामाजिक वनीकरण विभागाकडून करण्यात आलेल्या वृक्ष लागवड रोपांचे स्वरक्षण व संगोपन करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आ.मोहनभाऊ फड व विभागीय वन अधिकारी पी.ए. डोगरे यांनी केले इंद्रायणी माळ रस्त्याच्या दुतर्फा वड,पिंपळ, जांभूळ, निम,करंज,आदी प्रजातीच्या २ हजार ५००  रोपांची लागवड करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे प्रस्तावीक सहाय्यक वन संरक्षक डी. एस.खूपसे यांनी केले.तर सौ. सुषमा जाधव यांनी आभार मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें