सेलू :- शहरातील नुतन महाविद्यालय, नगरपालिका, वन विभाग व एनएसएस कँप सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने नुतन महाविद्यालयाच्या परिसरात शनिवारी 7 जुलै रोजी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण करण्यात आले.
राज्य सरकारने सूरू केलेल्या विविध उपक्रमांची अमलबजावणी नुतन महाविद्यालयात नेहमीच होत असते. वृक्षलागवड उपक्रमातही हिरिरीने सहभाग नोंदवला आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता वृक्षलागवड करण्यास सुरुवात केली. यावेळी प्राचार्य डाॅ. शरद कुलकर्णी, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, ग्राहक संरक्षण परिषदेचे डाॅ. विलास मोरे, एनएसएस कँपचे विभाग प्रमुख रमेश बैनवाड, प्रा. किर्ती निरालवाड, प्रा. लिंबाजी काळे, प्रा. राजाराम झोडगे, प्रा. माणिक सवंगवडकर, प्रा. अर्चना पत्की, अंतर्गत गुणवत्ता विकास विभागाच्या समन्वयक प्रा. निर्मला पद्मावत, रंगनाथ रेंगे, अशोक खंदारे, बबलू मंडलीक, गौतम साळवे, यांच्यासह वन विभाग, नगर पालिका व नुतन महाविद्यालयाचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. राज्यात वातावरणीय बदल, दुष्काळ, गारपीट यासारखे अस्मानी संकट दर दोन-तीन वर्षांनी कोसळत आहे. याचा परिणाम राज्याच्या अर्थकारणावर होत असतो. या समस्येचे समूळ उच्चाटन करायचे असेल, तर वृक्ष लागवड केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वृक्ष लागवड हा इव्हेंट नाही, हे मिशनमोड स्वरूपात करावयाचे काम आहे. कारण जगण्यासाठी प्रत्येकाला पैसा नाही, प्राणवायू लागतो. हा प्राणवायू तयार करण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे आवश्यक असल्याचे यावेळी प्राचार्य डाॅ. शरद कुलकर्णी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें