मुख्याधिकारी नगराध्यक्षा कडून शासनाची फसवणूक गुन्हा दाखल करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 8 जुलाई 2018

मुख्याधिकारी नगराध्यक्षा कडून शासनाची फसवणूक गुन्हा दाखल करण्याची मागणी.


बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्मचारी भासवून संगनमताने मिळवली पदस्थापना.


सेलू प्रतिनिधी.समशेर खान.

नगरपरिषद पाथरी येथे कंत्राटी कामगार असलेल्या व्यक्तीने कर्मचारी असल्याचे भासवून सेलू नगरपरिषदेत बदली करून घेण्याकरिता बनावट दस्तावेज तयार करून मुकादम या पदावर नोकरी मिळवली असून या प्रकरणात त्यास संगनमताने  सहकार्य करणाऱ्या नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यासह इतरावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी दिलीप डासाळकर यांनी जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्याकडे केली आहे याबाबतची अधिक वृत्त असे की नगरपरिषद पाथरी येथे कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या शेख शफी शेख मुजीब यांनी आपण नगरपरिषद पाथरी येथे मुकादम या पदावर कार्यरत आहोत व आपल्याला मुलाबाळांच्या शिक्षणाकरता सेलू नगरपरिषदेत मुकादम या पदावर घेण्यात यावे याकरिता  बनावट कागदपत्र तयार करून प्रस्ताव सादर केला होता त्या प्रस्तावास मान्यता देण्याकरिता सेलू चे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी सेलू नगर परिषदेत दिनांक 11 10 2017 रोजी  विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करून त्यात सदरील ठराव संमत करून  घेतला
तसेच तत्कालीन पाथरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांच्याकडे सेलू नगरपरिषदेचा मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार होता त्यामुळे या प्रकरणात शेख शफी यांना बनावट कागदपत्र तयार करण्यास मुख्याधिकारी देविदास जाधव यांनीच मदत केल्याचे उघड होते

नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी नगरपरिषदेत त्याबाबतचा ठराव घेतल्यामुळे तसेच मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सादर केलेला प्रस्ताव संमत करून शेख शफी  शेख मुजीब यास सेलू नगरपरिषदेत मुकादम या पदावर 1 1 2018  रोजी पदस्थापना देऊन रुजु करुन घेतले त्यामुळे एक प्रकारे या सर्वांकडून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली असल्याचे उघड होत आहे तरी संबंधिताविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत व सेलू नगरपरिषदेने घेतलेला ठराव क्रमांक 59 रद्द करावा तसेच सदरील कर्मचाऱ्याची नियुक्ती रद्द करून त्याने आजवर घेतलेल्या शासकीय लाभाची वसुली करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलीप डासाळकर यांनी केली आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें