आमदार रमेश कदम सोलापूर लोकसभेसाठी एमआयएम चे उमेदवार! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 8 जुलाई 2018

आमदार रमेश कदम सोलापूर लोकसभेसाठी एमआयएम चे उमेदवार!


प्रतिनिधी.
सोलापुर=लोकसभेच्या निवडणूकांचे बिगूल कधीही वाजू शकतो. लोकसभेसाठी अनेकांनी तयारी सुरु केली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एमआयएम कडून मोहोळचे आमदार रमेश कदम निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत प्रार्थमिक चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून मोहोळचे आमदार झालेले रमेश कदम यांनी अवघ्या ७ महिन्यात मोहोळ मतदारसंघात विकास कामांचा सपाटा लावला होता. त्यांच्या कार्यपद्धतीवर आकर्षित होवून हजारो तरुण त्यांचे चाहते झाले होते. मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता आणि आधी रस्ते मग वाळू या त्यांच्या आंदोलनामुळे ते घराघरात पोहचले होते.
लोकशाहिर आण्णाभाउ साठे महामंडळ घोटाळ्यात ते सध्या तुरुंगात आहेत. मात्र तुरुंगातून ते जिल्ह्याच्या राजकारणावर लक्ष ठेवून आहेत. यासाठी त्यांनी कासवगतीने मोर्चेबांधणी सुरु केला आहे. एमआयएम च्या नेत्यांच्या संपर्कात कदम समर्थक असून उमेदवारी बाबत चर्चा सुरु आहे. हा प्रस्ताव लवकरच एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार ओवेसी यांच्या समोर ठेवण्यात येणार आहे. ओवेसींचा हिरवा कंदील मिळावा यासाठी कदम समर्थक आणि एमआयएमचे नेते प्रयत्न करत आहेत. दलित, मुस्लिम मतांवर या उमेदवारीचा परिणाम होवू शकतो.
आमदार रमेश कदम यांची उमेदवारी जिल्ह्याचे राजकारण बदलू शकते असे जाणकारांचे मत आहे. विद्यमान खासदार शरद बनसोडे, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे , भारिपचे ॲड.प्रकाश आंबेडकर, आरपीआयचे राजाभाऊ सरवदे , भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे हे आपल्या परीने प्रयत्न करत असतानाच कदमाच्या उमेदवारीने चुरस मात्र वाढली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें