कौसडी/प्रतिनिधी
जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागण्यासाठी दिनांक 28 जुलै शनीवार रोजी गाव बंदची हाक देण्यात आली .
मराठा समाजला शैक्षणिक शेत्रासह विविध शेत्रात गेल्या आनेक वर्षा पासुन आरक्षणा अभावी वंचित राहावे लागत आसल्याने आरक्षणाचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लागावा या साठी मागील काही दिवसा पासुन सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभर विविध ठीकानी शासनाचा निषेध करण्यासाठी मराठा समाज बांधवाच्या वतीने
ठोक मोर्चा,रास्तारोको,चक्का जाम,धरने आंदोलन या सह विविध प्रकाराणे शासनाचा निषेध केल्या जात आहे.गेल्या काही वर्षा पासुन प्रलांबीत प्रश्न शासन दरबारी मार्गी लागला जात नाही या गोष्टीला कंटाळुन औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे या मराठा तरूणाने गोदावरी नदी पात्रात जल समाधी घेऊन जिवन यात्रा संपवली तसेच बिड जिल्ह्यातील मराठा तरूणाने
कीटक नाशक प्राशन करून आरक्षण या प्रलंबीत प्रश्नावर शासनाचा निषेध करून प्राणाची आहुती दिली .
व बहुतांस मराठा तरूणानी देखील आरक्षणा संदर्भात जिवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यभर सकल मराठा समाजाच्या वतीने तिव्र आंदोलन होऊनही शासनाला जाग येत नसल्याकाराणाने मराठा ठोक मोर्च्यास पाठींबा दर्शवण्यासाठी कौसडी येथील सकल मराठ समाजाच्या वतीने शनीवार दिनांक 28 जुलै रोजी गावबंदची हाक देण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें