तिर्थक्षेञ अंतर्गत ईद्रांयणी माळाचा विकास करणार- आमदार मोहनराव फड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 27 जुलाई 2018

तिर्थक्षेञ अंतर्गत ईद्रांयणी माळाचा विकास करणार- आमदार मोहनराव फड.


मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२७: महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक तालुक्याला १०००० वृक्षलागवड होणार आहे या निमित्त मानवत तालुक्यातील भोसा येथील ईद्रायणी माळ येथे १० हजार वृक्षलागवड आज दि.२७ जुलैरोजी करण्यात आली यावेळी आपले मनोगत व्यक्त  करताना जिल्हाधिकारी म्हणाले की,वृक्षलागवड करण्यासाठि जनतेने हि सहकार्य करावे ज्यामुळे निसर्गाचे समतोल राखण्यास मदत होईल.जिल्हापरिषद च्या वतीने तसेच तालुक्यातील कर्मचारि व शिक्षण विभाग,पंचायतसमीती कर्मचारि  वर्ग यांच्या सहकार्याने एक हजार कर्मचाऱ्यांनी तब्बल १० हजार वृक्षाची लागवड आज ईद्रायणी माळ येथे करण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी पि.शिवाशंकर ,आमदार मोहनरावजी फड,जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारि बी.पी.पृथ्वीराज यांनी उपस्थीततांना वृक्षलागवड बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी पि.शिवाशंकर ,आमदार मोहनरावजी फड,जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारि बी.पी.पृथ्वीराज,तहसिलदार निलम बाफना,गटविकास अधिकारि डी.बी.घुगे, नायब तहसिलदार नकुल वाघुंडे ,गटशिक्षणाधिकारी ससाने,विष्णु श्रीरंगराव जाधव,उपजिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे,पंचायत समिती सदस्य दत्ताञय ज्ञानोबा जाधव आदी उपस्थीत होते.यावेळी मान्यवराचे वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार मोहन फड म्हणाले की ईद्रायणी माळ हा माझ्या श्रध्दास्थान असुन तिर्थक्षेञ अंतर्गत ईद्रायणी माळाचा आपण विकास करणार असुन ईद्रायणी माळच्या सुशोभीकरणासाठी साठ
लाख रुपये शासनाने मंजुर केले आहे तसेच प्रशासनाने ईद्रायणी माळ येथे  वृक्षलागवड साठी निवडल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले व झाडाच्या देखरेखची ही स्वत जबाबदारी स्वीकारली आहे.या कार्यक्रमाचे सुञसंचालन विस्तार अधिकारि मधुकर उमरीकर यांनी केले तर आभार पंचायत समिती सदस्य दत्ताञय ज्ञानोबा जाधव यांनी मानले.या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठि विस्तार अधिकारि विखे सर ,विस्तार अधिकारि सय्यद सादेक आदीनी परीश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें