प्रा. आरती बोबडे यांच्याकडून वाढदिवसानिमित्त ग्रंथ भेट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 11 जुलाई 2018

प्रा. आरती बोबडे यांच्याकडून वाढदिवसानिमित्त ग्रंथ भेट.


सोनपेठ( राजेश खेडकर) दि.११जुलै २०१८
वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ग्रंथदान करण्याची परंपरा कायम राखत शहरातील कै. रमेश वरपुडर कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापिका  श्रीमती  आरती बोबडे  यांनी  त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसानिमित्त  महाविद्यालयाच्या ग्रंथालयात नुकतीच ग्रंथभेट दिली. या शैक्षणिक वर्षातील  महाविद्यालयाच्या ग्रंथालयात  प्राप्त झालेली  ही  दुसरी ग्रंथभेट आहे.
विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारी व लोक पावत जाणारे वाचन संस्कृती पुनर्जिवित करण्यासाठी तालुक्यातील वाचनप्रेमी हिरीरीने ग्रंथदान करत आहेत. यासाठी ग्रंथ वाचन चळवळीच्या आवाहनास तालुक्यातून मोठा प्रतिसादही मिळत आहे. यामुळे अनेक शाळा व महाविद्यालयातून रोज नवा वाचक निर्माण होत आहे. वाचन संस्कृती जपण्यासाठी सर्वस्तरातून अखंड प्रयत्न गरजेचे असून यातूनच भविष्यातील चांगला नागरिक घडणार आहे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. यावेळी ग्रंथदान समारंभास ग्रंथपाल  प्रा. आनंद  सरकाळे, ग्रंथालय परिचर  संतुक कुलकर्णी, सोनपेठ ग्रंथ वाचन चवळीचे सदस्य प्रा. डॉ. संतोष रणखांब यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त सुरू केलेला ग्रंथ दानाची ही परंपरा महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी कायम राखावी व आपले ग्रंथालय तसेच ग्रंथांचा लाभ घेणाऱ्या वाचक विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालावी असे आवाहन सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें