तालुक्यातील मौजे वाणीसंगम येथील कु.नेहा संजय चव्हाण ही आई वडीलाच्य प्रेमास पारखी असलेली चुनचूणीत मुलगी शैक्षणिक वर्ष २०१६ मध्ये गावातील जि.प. प्राथमिक शाळेत
पहिल्या इयत्तेत प्रवेशित झाली. दरम्यानच्या कालावधीत शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक डी. के. पवार यांना तिच्या घरची परिस्थिती अतिशय वाईट असल्याचे लक्षात घेऊन, तिची कौटुंबिक व आर्थिक परिस्थीती भविष्यात तिच्या शिक्षणात अडथळा बनू शकते असे त्यांनी जाणले. शाळेतील मुख्याध्यापकासह शिक्षकांची मुलांसाठी असलेली समर्पणाची भावना, गावाला पटलेले गावच्या शाळेचे व शिक्षकांचे महत्त्व हे पाहून ग्रंथवाचन चळवळ सोनपेठ चे अध्यक्ष राजेश खेडकर यांनी या शाळेस वारंवार दिलेल्या भेटीतून जाणले होते. या शाळेतील शिक्षक वर्ग ही शाळेत शिकणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शैक्षणिक व आर्थिक मदत वर्षभर पुरवत असतात. मात्र शिक्षकांच्या बदली नंतर पुढे काय? हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक डी के पवार यांनी सोनपेठ येथील शैक्षणिक व सामाजिक कार्यात पुढे असलेल्या सोनपेठ ग्रंथवाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर यांच्याशी शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या व कुमारी नेहा हिच्या विषय चर्चा केली. यावेळी खेडकर यांनी सदरील मुलीस शक्य होईल तेवढी मदत पुरविण्यास सहकार्य करील असा शब्द दिला व त्यांनी सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे लिपिक तथा श्री अन्नपूर्णा चारिटेबल ट्रस्ट परळी वैजनाथ चे सचिव संजय स्वामी व अध्यक्ष मुकेश कलंत्री यांच्याशी तात्काळ संपर्क साधला. याचे फलित म्हणजे श्री अन्नपूर्णा चारीटेबल ट्रस्ट परळी वैजनाथ ने कु.नेहाचे अजीवन शैक्षणिक पालकत्व स्विकारले.
जून २०१६ ला पहिली पासून ते नेहा शिकेल तिथपर्यंत च्या शैक्षणिक खर्चाचे उत्तरदायित्व अन्नपूर्णा चारीटेबल ट्रस्ट ने स्वीकारले आहे.
नुकतेच यावर्षी चे संपुर्ण साहित्य वाटप करण्यात आले. हे सलग त्यांचे तिसरे वर्ष आहे.
साहित्य वाटपाच्या या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष मुकेश कलंत्री, सदस्य सर्वश्री अनिल लाहोटी, राज उदगीरकर, कु.खुषी कलंत्री, सुरेशअप्पा निलंगे, पप्पू शेट्टे, स्वप्निल सावजी, गावचे सरपंच बाबुराव काळे, समिती अध्यक्ष संदिपान झिरपे, सदस्य धोंडिराम झिरपे, शाळेचे मुख्याध्यापक डि.के.पवार, सहशिक्षक संतोष डांगे, भगवान चव्हाण इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमा शेवटी श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने खाऊ म्हणून बिस्किट पुडे वाटप करण्यात आले. शाळा व व्यवस्थापना तर्फे ट्रस्टचे आभार व्यक्त केले.
जि.प.शाळेच्या इतिहासातील ही अनाथ विद्यार्थ्याचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्याची पहिली घटना असावी असे मत व्यक्त करतांना, यासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण व केंद्रप्रमुख कोटलवार यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळते असेही सांगायला मुख्याध्यापक डी. के. पवार विसरले नाही.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें