स्वामी विवेकानंद शाळेच्या दिंडीने वेधले लक्ष. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 24 जुलाई 2018

स्वामी विवेकानंद शाळेच्या दिंडीने वेधले लक्ष.


सेलू / प्रतिनिधी. समशेर खान.
आषाढी एकादशी निमित्त स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या वतीने आषाढी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा केली होती. तसेच काही विद्यार्थ्यांनी विविध संतांची वेषभूषा केली होती. हातात भगवी पताका ,टाळ - मृदुंगाच्या नादात , पाऊली खेळत ,विठुनामाच्या गजरात दिंडी अतिशय उत्साहात निघाली. लोकमंगल नगर येथील विठ्ठल- रुखमाई मंदिरात दिंडीचा समारोप महाआरतीने करण्यात आला.
शालेय समिती अध्यक्ष श्री.सुधीरराव चौधरी, स्थानिक कार्यवाह श्री. किरणराव डूघरेकर ,मु.अ. बळवंत देशमुख,वसंतराव जोशी ,राम मैफळ, दत्तात्रय पौळ, यांची उपस्थिती होती.आषाढी एकादशी निमित्ताने वारी व आषाढीचे महत्व विनोद मंडलिक यांनी विशद केले.मुलांनी विविध गवळण ,अभंग, सादर केली. लोकमंगल नगरातील नागरिकांतर्फे फराळाचे वाटप करण्यात आले. लोकमंगल नगर येथे जणू पंढरीच अवतरली होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय चौधरी, गजानन साळवे, शंकर राऊत, चेतन नाईक ,सतीश भुजबळ, श्रीपाद जोशी, काशिनाथ पांचाळ, चक्रधर वाघमारे, चंदू कव्हळे ,अभिषेक राजूरकर, रागिणी जकाते ,दीपाली भावसार, दीपाली पवार ,संध्या शोभने, उज्ज्वला धर्माधिकारी, सेवक दत्ता गिरी यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें