कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड (दि:-२४ जुलै) एक दिवसा पुर्वी मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते यात आंदोलन करणा-या एकाचा मृत्यू झाला काकासाहेब शिंदे (रा. नागड कानडगाव, गंगापूर) असे मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे।
दिनांक:-२४ जुलै पासून कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद समोर मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी ठिय्या आंदोलन करणार आहे।
जोपर्यंत राज्य सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण जाहिर होत नाही तोपर्यंत माझे ठिय्या आंदोलन मी सुरु ठेवणार आहे असे कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले मी सर्व मराठा समाज तसेच ईतर समाज बांधवांना जाहिर विनंती करतो की या ठिय्या आंदोलनात सहभागी व्हा असे देखील आव्हान आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें