कौसडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचा राजीनामा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 4 जुलाई 2018

कौसडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचा राजीनामा.


(तिन वर्षापुर्वी झाली होती निवड)

(संचालकांच्या त्रासामुळे अध्यक्ष पादाचा दिला राजीनामा) 


कौसडी  प्रतिनिधी..
जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवड अंदाजे सन 2016 मध्ये झाली होती या निवडणुकीत बोर्डीकर गटाचे आठ सदस्य व भांबळे गटातील पाच सदस्य निवडुण आले होते
या निवडणुकीत बोर्डीकर गटाचा वर्चस्व आसल्याने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी तातेराव रामराव बारवकर यांची सर्वांनमते निवड करण्यात आली होती
परंतु अध्यक्षाचे  व काही संचालकाच्या आपसी मतभेद मुळे व काही संचालकाच्या सतत तिन वर्षातील त्रासामुळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा तातेराव रामाराव बारवकर यांनी दिनांक 3 जुलाई रोजी सहायक निबंधक जिंतुर यांच्या कडे दिले  आहे

मागील तिन वर्षा पासुन या संस्थेतील काही संचालक मला त्रास देत आसल्याने  त्यांच्या त्रासाला कंटाळुन मी या आध्यक्ष पदा चा राजीनामा दिला व या पुढेही मी कोणत्याहीपदावर नसलातरी मी मा.आ.रामप्रसाद कदम बोर्डीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार =तातेराव रामाराव बारवकर.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें