पोलीस नाईक मा. दिपक साबळे यांच्यामुळे खाकी वर्दीतही माणुसकी बघायला मिळाली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 4 जुलाई 2018

पोलीस नाईक मा. दिपक साबळे यांच्यामुळे खाकी वर्दीतही माणुसकी बघायला मिळाली.



सचिन उपाध्ये
 आश्वी  (प्रतिनिधी) :

पोलीस म्हटले की सामान्य माणसाला धास्तीच उभी राहते. पोलीसां विषयी सामान्य माणसांच्या मनात द्वेष असतात. त्यामुळे सामान्य माणसांचा पोलिसांवर विश्वास नाही. सामान्य माणसांना वाटते कि पोलिसांना भावना नाहीत. त्यांना सामान्य माणसांची कदर नाही.  परंतु काही दिवसांपासून व्हाॅट्सअप वर पोलीस बांधव पोलीस नाईक मा. दिपक साबळे यांचा जाहीर माफीनामा प्रत्येक ग्रुपमध्ये पाहण्यासाठी मिळत आहे. ज्यातून आपल्याला खाकी वर्दीतही माणुसकी बघायला मिळाली.

पोलीस नाईक मा. दिपक साबळे यांची ६ वर्षा पुर्वी नारायणगाव पोलीस स्टेशनला नेमणुक झाली, कायदयाचा अभ्यास न संपणारा या वुक्ती प्रमाणे काम चालु केले काही दिवस आळेफाटा चौकी व नंतर निमगावसावा दुरक्षेत्र असे काम केले शांत, समजुतदार व मनमिळावु लोक, एका लोकसेवकाला समजुन घेउन मान - सन्मान देणारे लोक असाच अनुभव या भागात आला असे त्यांचे मत आहे. आता त्यांची  बदली खेड पोलीस स्टेशन येथे झाली असुन असून त्यांनी व्हाॅट्सअप ग्रृपवर टाकले कि या ५-६ वर्षात माझे कडून कुणाचा कामाच्या धावपळीत जर अपमान झाला असेल किंवा कोणाचे एखादया कामात दिरंगाई झाली असेल तर मोठया मनाने माफ करावे.  तसेच आपण सर्वांनी मला जे प्रेम दिले जो मान सन्मान दिला त्या बद्दल मी माझ्या कुटूंबियाचे वतीने आपले आभार मानतो.

सर्वांना एकच  विनंती करतो की पोलीस हा सुद्धा तुमच्या आमच्या सारखा एक माणुस असतो त्याला समजुन घ्या सहकार्य करत जा. यांच्या जाहीर माफीनामाला सोशलमिङीयावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे सोशलमिङीयावर सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. कारण याआधी असे कोणत्याच पोलीस बांधवांनी सामान्य जनतेला जाहीर माफी मागितली नाही. पोलीस नाईक मा. दिपक साबळे यांच्या जाहीर माफीनामा यामुळे सामान्य जनतेच्या मनात पोलिस बांधवांसाठी कुठेतरी आपुलकी निर्माण झाली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें