जुहू समुद्रात पाच जण बुडाले, एकाला वाचवले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 5 जुलाई 2018

जुहू समुद्रात पाच जण बुडाले, एकाला वाचवले.


मुंबईतील जुहू चौपाटीवर पोहण्यासाठी गेलेले पाच मित्र बुडाल्याची घटना आज (गुरूवार) सांयकाळी पाचच्या सुमारास घडली. यातील एकाला सुखरूप बाहेर काढण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले असून इतर चौघांचा शोध सुरू आहे. हे सर्वजण अंधेरीतील डीएननगर येथील रहिवासी आहेत. गोदरेज चौपाटी व गांधीग्राम चौपाटीच्या मधल्या भागात ही घटना घडली. फैसल शेख (१७), फरदिन सौदागर (१७), वसीम सलीम खान (२२), नाझीर गाझी (१७) आणि सोहेल शकील खान (१७) अशी पाच जणांची नावे आहेत. यातील वसीम खान याला सुरक्षा रक्षकांनी वाचवले असून अन्य चौघांचा शोध सुरू आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें