दहशतवाद्यांकडून पोलीस कॉन्स्टेबलचं अपहरण करुन निर्घृण हत्या. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 6 जुलाई 2018

दहशतवाद्यांकडून पोलीस कॉन्स्टेबलचं अपहरण करुन निर्घृण हत्या.


जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण करुन त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. जावेद अहमद डार असे हत्या करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्यांचा मृतदेह कुलगाम येथे आढळून आला. दहशतवाद्यांनी कचदूरा परिसरातून त्यांचे अपहरण केले. मेडिकलमध्ये आईसाठी औषध आणण्यासाठी गेलेले असताना जावेद यांचे अपहरण करण्यात आले. गुरुवारी (5जुलै) संध्याकाळी ही घटना आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारमधून तीन ते चार शस्त्रास्त्रधारी दहशतवादी आले. त्यांनी हवेत गोळीबार केला व त्यानंतर जावेद यांच्यावर बंदूक रोखत त्यांनाही स्वतःसोबत घेऊन गेले. जावेद यांचे अपहरण करुन हत्या केल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेनं स्वीकारली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी भारतीय लष्करातील जवान औरंगजेब यांचेही अपहरण करुन हत्या केली होती.  दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. सुरक्षा दलाविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी या परिसराचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें