दुबार पेरणीचे संकट टळले.
कौसडी प्रतिनिधी..
जिंतुर तालुक्यातील कौसडी परिसरातील शेतक-यांनी जुन महीण्याच्या सुरवातीला पडलेल्या पावसामुळे पेरणीचे कामे सुरू केली होती त्यात पंन्नास ते सत्तर टक्के शेतक-यांनी कापसाची लागवड सुध्दा केली होती कापसाचे पिक बहरून दिसत होते मात्र मागील दोन आठवड्यापुर्वी सतत दहा ते पंधरा दिवस पावसाने उघडीप दिल्याने बहरलेली पिके मान टाकत होती व पेरलेले सोयाबीन मुग उडीद तुर हे पिके जमीनीतुन उगवलेच नव्हते या मुळे शेतकरी हवालदिल झाला होता मात्र शनिवार व रविवार या दोन दिवसा त पावसाने चांगली हजेरी लावल्याने मान टाकणा-या पिकांना व जमीनीतुन न उगवलेली पिकांना जिवनदान मीळाल्याने दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकरी वर्गात एक आशेचे कीरण दिसले व शेतकरी राहेलेली पेरणीत पुन्हा मग्न झाला आहे
मागील तिन ते चार वर्षात शेतकरी दुष्काळात होरपडुन निघत आहे तरी शेतक-यांनी हिम्मत न हारता खाजगी सावकारा कडुन कर्ज काढत बि-बियाने रासायनिक खते आणुन या वर्षी पेरणी करत आहे फक्त एकच आशेने शेतकरी रात्रन दिवस शेतात राबत आहे की या वर्षी तरी उत्पन्न चांगले होईल शेतक-यांची ही आशा आत्ता फक्त वरूण राजा वरच अवलंबुन आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें