७०-३० चा फॉर्मुला रद्द करा;अन्यथा तीव्र आंदोलन करु – आमदार विजय भांबळे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 10 जुलाई 2018

७०-३० चा फॉर्मुला रद्द करा;अन्यथा तीव्र आंदोलन करु – आमदार विजय भांबळे.


मराठवाडयातील सर्वपक्षीय आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन.



जिंतूर : ७०-३० चा फॉर्मुला सरकारने रद्द करावा आणि समान कायदा…समान नेमणूक आणि गुणवत्तेवर सिलेक्शन झाले पाहिजे अशी मागणी करतानाच सरकारने याची लवकर दखल घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना तीव्र स्वरुपाचे आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विजय भांबळे यांनी दिला.

मराठवाडयातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या पक्षाच्या सर्व आमदारांनी ७०-३० च्या फॉर्मुल्याविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. इंजिनिअरींग, मेडिकल कॉलेजच्या विदयार्थ्यांना असा रेषो लावला आहे की, मराठवाडा सोडून ज्या काही जागा असतील त्या उर्वरीत भागासाठी विदयार्थ्यांना मिळतील. आता राहिलेल्या ३० टक्के जागा मराठवाडयासाठी मिळणार आहेत असा अन्यायकारक निर्णय भाजप सरकारने घेतला आहे असा आरोप आमदार विजय भांबळे यांनी केला.

दरम्यान जे हुशार विदयार्थी आहेत ते त्यांच्या कर्तुत्वाने पुढे येतील अशा विदयार्थ्यांना राखीव जागा असल्या पाहिजेत अशी मागणीही आमदार विजय भांबळे यांनी केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें