तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धा उत्साहात संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 27 जुलाई 2018

तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धा उत्साहात संपन्न.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि. २७जुलै २०१८
येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या मैदानावर तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धांचे उद्घाटन करण्यासाठी उद्घाटक म्हणून हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वर कदम तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वसंत सातपुते होते. प्रमुख पाहूणे म्हणून तालुका क्रीडा अधिकारी सुमित लांडे होते.
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना सुरूवात झाली असून शहरातील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या मैदानावर मुलांच्या शालेय खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेसाठी २४ संघानी सहभाग नोंदवला होता. १९ वर्षाखालील गटात कै. रमेश वरपुडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला. १७ वर्षाखालील वयोगटात केदारेश्वर विद्यालय उखळी तर १४ वर्षाखालील वयोगटात कै. राजाभाऊ कदम इंग्लिश स्कुल या संघानी तालुक्यात बाजी मारली असून जिल्हास्तरीय स्पर्धा १८ सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणार आहेत.
या कार्यक्रमाच्या वेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य शेख शकिला, क्रीडा संचालक प्रा. गोविंद वाकणकर, क्रीडा समितीचे सदस्य प्रा. डॉ. कल्याण गोलेकर, प्रा. डॉ. अशोक जाधव, प्रा. डॉ. संतोष रणखांब, प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख प्रा. कैलास आरबाड,  प्रा. सुरेश मोरे,  प्रा. संतोष वडकर,  प्रा. महालिंग मेहत्रे, प्रा. सतिश वाघमारे,  प्रा. जीवन भोसले, प्रा. रवि धोंडगे, क्रिडा व्यवस्थापक रविकुमार स्वामी, नागनाथ नळगे, गौरीशंकर मोदी, सुरज गायकवाड,  विठ्ठल राठोड, सुजीत माळी, प्रमोद मोरे, अवधुत गीरी, धम्मानंद खंदारे,  सिद्धेश्वर कांबळे, नंदकुमार मुंडे,  प्रल्हाद आळसे, शिवाजी कांबळे, आदिंची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. आरती बोबडे तर प्रा.मंगल गव्हाणे यांनी आभार मानले. पंच म्हणून महेंद्रकुमार धर्मे, रवि कलिंदर, ज्ञानेश्वर कलिंदर,  गणेश बोचरे उमेश मुळे, करण राठोड, गजानन खरात, आदिंनी काम पाहीले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें