सोनपेठ येथील कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग व बुलढाणा अर्बन को.अॉप. सोसायटी शाखा सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने के. रमेश वरपुडकर महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डाॅ. वसंत सातपुते, शाखाधिकारी प्रल्हाद पवार, विष्णू घायाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा. डाॅ. बापुराव आंधळे, ढमे, गिराम, तौर, प्रा. डाॅ. शिवाजी वडचकर, प्रा. डाॅ. एम. बी. पाटील, प्रा. डॉ. गोविंद वाकणकर व महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यार्थी, बँकेचे कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें