सेलु प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य तलवारबाजी व औरंगाबाद तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त
विद्यमाने १३ वी मिनीगट व २ री १० वर्षे आतील गट स्पर्धा दि. ०६ ते ०८ जुलै २०९८ दरम्यान
आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये जिल्हयातील मुलाचा व मुलांचा संघ सहभागी झाला होता. मुलांच्या सांघिक या
गटांमध्ये ईपी प्रकारामध्ये रौप्य पदक पटकावले असून संघामध्ये सुदिप पोटेकर, प्रदुन शिंदे, पार्थ
मुंडे, आदित्य नलगीरकर, यांच्या समावेश होता तर वैयक्तीक गटामध्ये ईपी प्रकारामध्ये पार्थ मुंडे यांने
रौप्यपदक, ईपी प्रकारामध्ये आदित्य चव्हाण यांने कास्य पदक, फॉईल प्रकारामध्ये प्रदुन शिदे यांने
कास्य पदक पटकावले आहे.
स्पर्धेमध्ये खेळांडूना मार्गदर्शक अनिल रावले, सुशिल जोरणेकरविनित रणमाळअमोल
बुचाले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या खेळांडुना परभणी जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष
संजयराव देशमुख व सचिव प्रा. डा.पांडुरंग रणमाळ आदी यांनी यश संपादन केलेल्या खेळांदुवे
अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें