सेलू नगर पालिकेने खोदलेल्या खड्डयात गायीचा पडून मृत्यू,नाली सफाई साठी खोदलेल्या खड्डा घडली घटना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 31 जुलाई 2018

सेलू नगर पालिकेने खोदलेल्या खड्डयात गायीचा पडून मृत्यू,नाली सफाई साठी खोदलेल्या खड्डा घडली घटना.




सेलू !प्रतिनिधी

शहरातील रेल्वेस्टेशन ते बसस्थानक रोडवरील  नाल्याची साफसफाई करण्यासाठी बसस्थानकाच्या समोर असलेल्या  नालीची साफसफाई करण्यासाठी नगरपालिकेने  पक्की  नाली  जेसीबीने फोडून  खड्डा तयार केला. त्या नाली मध्ये साचलेल्या  घाण पाण्याची वाट काढून देण्यासाठी नगरपालिकेने दोन महिने अगोदर बस स्थानकाच्या  प्रवेशद्वारात एक मोठा खड्डा खोदला होता. त्या खड्डयाचे काम पूर्ण न करता  तो खड्डा तसाच ठेवण्यात आला होता. हा   खड्डा   नगरपालिका प्रशासनाने  बुजला नसल्याने  एक गाय  खड्डयात  पडून मृत्यू पावल्याची  घटना सोमवार 30 जुलै रोजी सकाळी आढळून आली.  त्या खड्डयांमध्ये मृत अवस्थेत पडलेली गाय  नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पाहिल्यावर  या गाईस  खड्डयाच्या बाहेर  काढण्यात आले.  नगरपरिषदेची गाडी बोलून मृत गायीला या  ठिकाणाहून नेण्यातआले.  हा प्रकार  नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळेच घडला असून  एका मुका प्राण्याचा जीव यामुळे गेला आहे. नगरपालिकेने तो खड्डा वेळीच बंद केला असता तर त्या गायीचा जीव वाचला असता. बस स्थानक परिसरात असलेला हा खड्डा गाईच्या मृत्यू नंतर देखील तसाचं ठेवण्यात आला आहे.  हा खड्डा तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें