भोकरदन प्रतिनिधी : शहराला पाणीपुरवठा करणार्या दानापुर येथिल जुई मध्यम धरणात आज रोजी मृत जलसाठा शिल्लक असुन त्यातुन भोकरदन शहराला पाणीपुरवठा होत आहे. सदर पाण्याचा साठा शहरासाठी १५ ते २० दिवस पुरेल इतका असुन यावर्षी आजपर्यंत या धरणात पाणी आले नाही. ऑगस्ट महिना सुरु होवुन सुद्धा धरण परिसरात व इतर ठिकाणी अपेक्षित पाउस न झाल्याने पावसाची हीच स्थिती कायम राहिल्यास शहराला धरणातुन पाणीपुरवठा करणे शक्य नाही.यामुळे पुढिल काळात भोकरदन शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्याचे शक्यता नाकारता येत नाही,
तरि मा. अध्यक्षा महोदयांनी लवकरात लवकर विशेष सर्वसाधारण सभा बोलावुन पाणीपुरवठा विषयी योग्य त्या उपाययोजना करुन शहरातिल सामान्य नागरिक, महिला वर्ग यांची या समस्येतुन सुटका करावी अशी मागणीचे निवेदन पाणीपुरवठा सभापती व उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते तथा नगरसेवक
श्री.प्रा.रणविरसिंह जाधव गटनेता,नगरसेवक श्री. नसिम खान बशीर खान पठाण ,नगरसेविका सौ.निर्मलाताई भिमराव भिसे, नगरसेविक श्री.अब्दुल कदिर नगरसेवक,नगरसेविका सौ रजियाबी अजहरअली शाह
उपस्थित होते.
प्रतिक्रिया : पावसाळ्यात नगरपरिषदेचे पाच दिवस आड नियोजन आहे तर उन्हाळ्यात काय हाल होतील सांगता येत नाही. वेळीच योग्य नियोजन व उपाय योजना करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात यावी .नासरसेवक अब्दुल कदिर.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें