अंधेरी रेल्वे स्टेशनजवळ पादचारी पुलाचा भाग कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत, 2 जण जखमी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 3 जुलाई 2018

अंधेरी रेल्वे स्टेशनजवळ पादचारी पुलाचा भाग कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत, 2 जण जखमी.


पश्चिम रेल्वेवरीलअंधेरी स्टेशनजवळ पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. रेल्वे ट्रॅकवरच पादचारीपुलाचा काही भाग कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या घटनेमुळे चर्चगेटहून विरारकडे जाणारी व विरारहून चर्चगेटच्या दिशेनं येणार वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 वरील ही घटना आहे. विलेपार्ले व अंधेरीदरम्यान असलेल्या गोखले पुलाचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. 7.35 वाजण्याच्या सुमारास गोखले पूल कोसळला. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेस झालेल्या या खोळंब्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान,  अग्निशमन दल आणि पश्चिम रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून कोसळलेल्या पुलाचा ढिगारा बाजूला काढण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें