सेलू :- येथील ओम स्किन हेअर अॅन्ड लेझर क्लिनिक, उपजिल्हा रुग्णालय, डाॅक्टर्स असोसिएशन व नुतन महाविद्यालयाच्या वतीने 'डाॅक्टर्स डे' च्या निमित्ताने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी 84 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
सेलू शहरामध्ये दर वर्षी विविध प्रकारे डाॅक्टर्स डे साजरा करण्यात येतो. यावेळी प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डाॅ. आशिष मेहता यांच्या संकल्पनेतून इतर कार्यक्रमांना फाटा देऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नुतन संस्थेचे अध्यक्ष डाॅ. एस. एम. लोया, प्राचार्य शरद कुलकर्णी, साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, उद्योजक जयप्रकाश बिहाणी, डाॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. सुबोध माकोडे, डाॅ. सुनील कुलकर्णी, डाॅ. प्रताप घांडगे, डाॅ. शैलेश मालाणी, डाॅ. अनिकेत जोगदंड, डाॅ. आशिष मेहता, डाॅ. प्रिती मेहता, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डाॅ. विलास मोरे, प्रा. कमलाकर कदम, ओमप्रकाश मेहता, लक्ष्मी मेहता, प्रविण बिनायके आदींची उपस्थिती होती. परभणी येथील शासकीय रुग्णालयातील टिमने रविवारी सकाळी दहा वाजता रक्त संक्रमण करण्यास सुरुवात केली. दुपारी तीन वाजेपर्यंत 84 रक्तदात्यांनी रक्तदान केले. डाॅक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केल्यामुळे डाॅ. आशिष मेहता यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें