शेतकऱ्यांची नावे गारपीट अनुदानात तलाठ्यांनी टाकले नसल्याचा ग्रामस्थांकडून आरोप.
सेलू प्रतिनिधी
तालुक्यातील म्हाळसापुर येथील गारपीट ग्रस्त यादी चुकीची तयार करून शासनाची व जनतेची दिशाभूल केली असून खऱ्या गारपीट ग्रस्तांची नाव यादीमध्ये समाविष्ट न केल्याने तसेच यादीचे पुनरवलोकन करून लाभधारकास मदत द्यावी तसेच संबंधित तलाठी व मंडळ निरीक्षक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी म्हाळसापुर येथील शेतकरी बांधवांनी सोमवार 2 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सेलू तहसील कार्यालयात जवळपास 400 ते 500 शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या दालनात हे आंदोलन करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की काही मोजक्याच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती तसेच गारपिट अनुदान वाटप होत आहे यादी ची माहिती माळसा पुढचे तलाठी यांनी शेतकऱ्यांना चावडी वाचन करून न दाखविल्यामुळे शेतकऱ्यांना त्या काळात आपणाकडे तक्रार करता आली नाही म्हणून संबंधित तलाठी त्यांची चौकशी करून वंचित सर्व शेतकऱ्यांना गारपीटीची अनुदान तात्काळ वाटप करण्यात यावे नसता म्हाळसापुर येथील शेतकऱ्यांना धरणे निदर्शने उपोषण इत्यादी मार्गाचा अवलंब करावा लागेल याची सर्वस्वी जबाबदारी व त्यातून निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्था या संबंधित तलाठी जबाबदार राहतील असे गावकऱ्यांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर रामकृष्ण शेरे पाटील बालासाहेब भगवान सोळंके सुरेश जाधव सतीश जाधव मदन आवटे जाधव बालाजी जाधव रामभाऊ आवटे रामकिसन आवटे सोळंके अमोल भगवान हर मुडे आनंदा जाधव सुदाम जाधव दौलत आवटे माजी चेअरमन रामभाऊ आवटे गोविंद जाधव बाबुराव आवटे दत्तात्रय सोळंके आदींचा या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें