सेलूत पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ. अखिल भारतीय मराठी सेलू पत्रकार संघाचा उपक्रम. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 2 जुलाई 2018

सेलूत पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ. अखिल भारतीय मराठी सेलू पत्रकार संघाचा उपक्रम.


हिंदी मराठी ग्रंथालयात रंगला  कार्यक्रम.


सेलू (प्रतिनिधी )
                     अखिल भारतीय मराठी पत्रकार संलग्न सेलू तालुका पत्रकार संघाच्या वतीने संघातील पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ १ जुलै रोजी हिंदी मराठी ग्रंथालयात घेण्यात आला.
                          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष मोहन बोराडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सल्लागार पत्रकार कांचन कोरडे ,निसार पठाण यांची उपस्थिती होती याप्रसंगी पत्रकार संघामध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण व्हावे व स्नेहवृध्दिंगत व्हावा व गुणवंत पाल्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी  या उद्देशाने पत्रकार संघाच्या वतीने संघातील पत्रकारांच्या पाल्यांनी  दहावी बारावी परीक्षेत यश संपादन केले अशा  पाल्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये कु.पूजा विलास शिंदे,कु आदिती राधाकिशन कदम ,कु प्रेरणा संजय मुंढे ,चि.आदित्य अशोकराव अंभोरे या विद्यार्थ्यांचा शाल हार व पेन देऊन त्यांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी पत्रकार महम्मद ईलीयास , डॉ .विलास मोरे , संजय मुंढे, राधाकिशन कदम ,विलास शिंदे, मोहसिन अहेमद ,पंकज सोनी,शंभु काकडे  यांची उपस्थिती होती .प्रास्ताविक व सूत्रसंचालन रेवनआप्पा साळेगावकर यांनी केले

पत्रकार निसार यांचाही सन्मान=  पत्रकार संघाच्या वतीने संघातील पत्रकारांचा वाढदिवसाच्या दिवशी सन्मान करण्याची परंपरा चालू करण्यात आली आहे त्याप्रमाणे १ जुलै रोजी पत्रकार निसार पठाण यांचाही वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला .


 कर्तुत्वाचा ठसा उमटवा... कोरडे= विद्यार्थ्यांनी स्वंय  अध्यायनाने आपली गुणवत्ता सिद्ध करावी त्याच प्रमाणे सर्जनशीलता , प्रयोगशीलता, आणि कृतिशीलता कशी वाढीस लागेल याकडे कटाक्षाने लक्ष देऊन आपण आपल्या आवडीचे ध्येय पुर्ण करून  कर्तुत्वाचा ठसा उमटवावा असे आव्हान कांचन कोरडे यांनी केले

ज्ञानाच्या कक्षा रूंदवा...बोराडे.
                      शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांनी अंगी जिद्द चिकाटी व मेहनत घेण्याची तयारी ठेवली तर प्रतिकुल परीस्थीवर हि निश्चित मात करता येते अभ्यासा व्यतिरिक्त ईतर स्पर्धात्मक परीक्षेचे वाचन करून विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्यावर भर दिला पाहिजे असे अध्यक्षीय समारोप प्रसंगी अध्यक्ष मोहन बोराडे यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें