कॅन्सर मुक्त आई अभियानास सावळीविहिर येथून सुरुवात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 2 जुलाई 2018

कॅन्सर मुक्त आई अभियानास सावळीविहिर येथून सुरुवात.


प्रतिनिधी.राजेंद्र दुनबळे.
शिर्डी( प्रतिनिधी) MOC हॉस्पिटल मुंबई, कॅन्सर तज्ञ डॉ. प्रदीप केंद्रे आणि सोमैय्या विद्या मंदिर लक्ष्मीवाडी शाळेचे 1998-99 बॅचचे माजी विध्यार्थी यांच्या वतीने "कॅन्सर मुक्त आई अभियान" सुरू करण्यात आले. हे अभियान संपूर्ण देशभर राबविण्याचा मानस डॉ. केंद्रे यांनी सांगितले आपणही समाजाचे काही देने लागतो ही सामाजिक भावना ठेऊन  या आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा  मानून कमला सुरुवात केली असल्याचे या प्रसंगी आपले मत वेक्त केले
सदर अभियानाची सुरुवात उपसरपंच सौ. वृषालीताई जपे, सौ. वामन मॅडम व श्री. धायतडक सर यांच्या हस्ते रिबन कापून करण्यात आले.,मार्गदर्शन पर भाषणात ते म्हणले की जन्माला येणारी प्रत्येक स्त्री हि एकदिवस आई होणार आहे, आणि ती आई कॅन्सर मुक्त असावी अशी इच्छा डॉ. केंद्रे यांनी बोलून दाखविली. जर एका आईला कॅन्सर झाला तर संपूर्ण कुटुंबाची घडी विस्कटीत होते.
ग्रामीण भागामध्ये कॅन्सर विषयी फारशी जनजागृती नाही. त्याची लक्षण काय आहेत किंवा कॅन्सर होण्यापूर्वीच आपण काय काळजी घेऊ शकतो यावर डॉ. प्रदीप केंद्रे यांनी उपस्थित स्त्रियांना खूप चांगल्या प्रकारे व सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
नुकतेच डॉ. प्रदीप केंद्रे यांचे कॅन्सर विषयीचे आर्टिकल जगप्रसिद्ध "ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी" मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
  बऱ्याच कंपन्यांनी हे अभियान एका खेडे गावातून सुरु करण्यापेक्षा मुंबई पासून सुरु करावे अशी विनंती डॉ. प्रदीप केंद्रे यांना केली होती. पण ज्या गावात माझा जन्म झाला व ज्या शाळेत शिक्षण घेऊन मी इथंपर्यंत पोहचलो तिथूनच या अभियानाची सुरुवात व्हावी अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. व त्यावर गेल्या 15 दिवसांपासून डॉ. केंद्रे व शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन अभियानाची सुरुवात झाली.सोमैय्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. धायतडक सर यांनी असे माजी विध्यार्थी शाळेला लाभले हे शाळेचे भाग्यच आहे अश्या शब्दात माजी विद्यार्थ्यांचा गौरव केला. तर सौ. सविता राहणे मॅडम यांनी डॉ. प्रदीप केंद्रे व माजी विद्यार्थ्यांची "कॅन्सर मुक्त आई अभियान" हि एक अद्वितीय संकल्पना आहे. व माजी विद्यार्थ्यां कडून अशी संकल्पना राबविणे हे बहुदा देशातील पहिलेच उदाहरण असेल असे मत व्यक्त केले. याच वेळी कोळपेवाडी येथील रयत शाळेची गरीब विद्यार्थिनी कु. शारदा भागवत जिच्या डोक्यावरचे आई-वडिलांचे छत्र हरवले. सध्या ती मामा कडे असून तेच तिला सांभाळतात. पण त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शारदाच्या शिक्षणात अडचणी येत होत्या, तिला रोज 4 ते 5 किमी पायी जावे लागत होते. तर परिस्थिती हलाखीची असल्याने तीचे शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून सोमैय्या शाळेच्या 1998-99 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी कु. शारदा भागवत हिला दत्तक घेतले. तिच्या पुढील शिक्षणाचा सर्व खर्च ते करणार आहेत. अशी माहिती सर्वांच्या वतीने डॉ. केंद्रे यांनी दिली. शाळेत तिला पायी जाऊ लागू नये म्हणून नवीन सायकल माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते भेट म्हणून दिली.
सदर कार्यक्रमास इंटास फार्मासुटीकल्स लि. चे कर्मचारी तसेच विकास साठे . घाणे सर,पत्रकार राजेंद्र दूनबळे, विनय गिरी, नितीन बारहाते, मोसिन शेख, अशोक गाडेकर, सचिन काळोखे, सचिन शिरोळे, चंदू बोरसे, राजू आरणे, बाबा डांगे, बाबा होन तसेच, सोमैय्या शाळेच्या सौ. वृषाली जपे, सौ. वामन मॅडम, सौ. सविता राहणे, सौ. सारिका मानकर, सौ. परदेशी, सौ. क्षेत्रे ताई, सौ. लोखंडे ताई, कु. अंजली जमधडे तसेच शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, महिला व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे श्री. धायतडक सर यांनी सूत्रसंचालन केले तसेच उपस्थितांचे आभार मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें