नूतन महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त १९६८ - २०१८ या काळात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.संस्थाध्यक्ष डॉ. एस.एम.लोया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर एस.झेड.जाजू,बनारसीदास गुप्ता,प्राचार्य द.रा.कुलकर्णी,हेमंतराव आडळकर,नगराध्यक्ष विनोदराव बोराडे,संस्थेचे सचिव डी.के.देशपांडे,सहसचिव प्राचार्य डाॅ.व्ही.के.कोठेकर,जयप्रकाशजी बिहाणी,उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे,त्र्यंबकराव बोराडे व माजी विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या सुवर्ण वाटचालीच्या माहितीचे डिजिटल प्रकाशन करण्यात आले.आपल्या स्वागतपर निवेदनात नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी विद्यार्थीदशेतील आठवणींना उजाळा देऊन माजी विद्यार्थी संघटनेच्या इमारतीसाठी रु.१५ लाख देणगी जाहीर केली.तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनीही गत आठवणींना उजाळा देत महाविद्यालयामुळेच आम्ही घडलो असे प्रतिपादन केले. प्राचार्य डाॅ. शरद कुलकर्णी यांनी मेळावा आयोजना मागील भुमिका विशद केली.
उद्घाटनपर भाषणात एस.झेड.जाजू यांनी या महाविद्यालयातील संस्कारांमुळेच जीवनात यशस्वी मार्गक्रमण करता आल्याचे सांगून माजी विद्यार्थी संघटनेचे कार्य अधिक व्यापक व गतिमान करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.नांदेड येथील प्रसिध्द उद्योजक बनारसीदास गुप्ता तसेच माजी विद्यार्थी प्रतिनिधी विजया देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.उद्घाटन सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप डाॅ.एस. एम.लोया यांनी केला.
दुपारच्या सत्रात माझ्या जडण घडणीत महाविद्यालयाचा वाटा व महाविद्यालयाकडून अपेक्षा या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. या सत्राचे विषससूत्र उपप्राचार्य यादवराव गायकवाड यांनी कथन केले.यावेळी सुरेश रोडगे,प्रा.प्रशांत देशमुख,मालीनी जोशी,प्रा. विजय घोडके,डाॅ.गोदावरी पवार,गजेंद्र थोरात,आबासाहेब तौर,एम.के.देशपांडे,रविंद्र वैद्य,अॅड.नाझीम किडवई इ. माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करुन महाविद्यालयाकडून आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या.या सत्राचा अध्यक्षीय समारोप त्र्यंबकबापू बोराडे यांनी केला.व्यासपीठावर माजी आ.मोहनराव सोळंके,प्रा.दरगड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचलन प्रा.भाग्यश्री धामणगावकर,प्रा.संभाजी रोडगे,प्रा.माया रोडगे यांनी केले तर आभार प्रा.जी.एस.पिंपळगावकर व चिलवंत यांनी मानले. यामेळाव्यास १९६८ पासूनचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे महाविद्यालयात चैतन्याचे वातावरण दिसत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें