सेलू प्रतिनिधी
पठाण शमशेर खान
सेलू :- सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी सध्या राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.
दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत असुन शासनविरोधी वातावरण निर्माण झालेले पहावयास मिळत आहे. सेलू तालूक्यातील हजारो मराठा बांधवांनी दि. २६ जुलै रोजी तालूक्यातील वाघ प्रिंप्री येथे दुधना नदीच्या पात्रात अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान शासन विरोधी घोषणा देत मुख्यमंत्र्यांना टारगेट केल्याचे पहायला मिळाले. दोन मराठा आंदोलकाचे बळी गेल्याने आंदोलक आक्रमक झाले व तहसीलदारांना कंबरा ऐवढ्या पाण्यात येण्यास भाग पाडून निवेदन दिले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने प्रिंप्री गावाला छावणीचे स्वरूप आले होते.
तर मंत्र्यांना जलसमाधी देऊ - छगन शेरे नाकर्त्या सरकारने मराठा आंदोलकाचे दोन बळी घेतले असुन यासाठी सर्वस्वी मुख्यमंत्री जवाबदार असुन यापुढे मंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना जलसमाधी देण्याचा निर्वाणीचा इशारा मराठा मोर्चाचे समन्वयक छगन शेरे यांनी यावेळी दिला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें