सेलू प्रतिनिधी शमशेर खान
सेलू :- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वत्र आंदोलन सुरू असताना भाजप सरकार घेत असलेल्या नकारात्मक भूमिकेचा निषेध करत सेलू तालुका भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष माणिक उध्दवराव डख यांनी राजीनामा दिला आहे.
गेल्या तीन दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या संदर्भात 24 जुलै रोजी सेलू शहरासह ग्रामीण भागातही शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. आरक्षणा बाबत भाजप सरकार उदासीन व असंवेदनशील असल्याचा ठपका ठेवत मराठा समाजातील तरूण प्रचंड अस्वस्थ दिसून येत आहे. त्यामुळे शांततेत होणारे आंदोलन हिंसक वळण घेत आहे. आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सरकारने दोन आंदोलकाचे बळी घेतले आहेत. याच्या निषेधार्थ उपाध्यक्ष पदासह सदस्यत्वाचाही राजीनामा माणिक डख यांनी जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केला असून भाजपा मधिल इतर मराठा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामा द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें