सेलू प्रतिनिधी (समशेर खान)परभणी जिल्हा क्रीडा परीषद व
गट शिक्षणाधिकारी कार्यालय सेलू यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सेलू तालुका शालेय क्रीडा स्पर्धा कार्यक्रम ( 2018-19 )ची बैठक मुख्याध्यापक के व्ही. वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन विद्यालय सभागृहात यशस्वी संपन्न झाली. व्यासपीठावर मुख्याध्यापक चंद्रशेखर नावाडे, मुख्याध्यापक एस.एच. लहाने , मुख्याध्यापक सुनील गायकवाड, मुख्याध्यापक अरूण वैद्य, सेलू तालुका शा. शि. शिक्षक संघटना अध्यक्ष गणेश माळवे, संयोजक डी. डी. सोन्नेकर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी क्रीडा शिक्षक आर. बी. चव्हाण , प्रशांत नाईक यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संयोजक डी. डी. सोन्नेकर यांनी आभार सतीश नावाडे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. नागेश कान्हेकर यांनी केले. स्पर्धा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. 1) कुस्ती दि. 04 ऑगस्ट नूतन महाविद्यालय सेलू, 2) योग दि. 04 ऑगस्ट नूतन विद्यालय येथे, 3)बुद्धीबळ दि.06 ऑगस्ट नूतन विद्यालय, 4) तायकवाॅदो दि.10 ऑगस्ट प्रिन्स अॅकॅडमी , 5)कराटे दि. 10 ऑगस्ट प्रिन्स अॅकॅडमी, 6) व्हॉलीबॉल दि.13 ऑगस्ट नूतन विद्यालय, 7) क्रिकेट दि. 23, 24 ऑगस्ट नूतन महाविद्यालय, 8)कबड्डी दि. 27 ऑगस्ट मुले , दि.28 ऑगस्ट मुली शारदा विद्यालय, 9) खो- खो दि. 03 सप्टेंबर मुले, दि. 04 सप्टेंबर मुली प्रिन्स अॅकॅडमी, 10) मैदानी स्पर्धा दि. 10 सप्टेंबर मुले दि. 11 सप्टेंबर मुली नूतन विद्यालय येथे होणार आहेत. शासकीय क्रीडा स्पर्धेस जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष तथा तहसीलदार स्वरूप कंकाळ ,उपाध्यक्ष तथा गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे सचिव तथा स्पर्धा संयोजक डी. डी. सोन्नेकर यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें