आज अक्षदा मंगल कार्यालय सेलू येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी व व्याख्याते भरत दौंडकर होते. क्रांतीजोती सावित्रीबाई फुले याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी सेलू तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकासमवेत सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना आमदार विजय भांबळे म्हणाले की,सेलू तालुक्यात शिक्षणाची पंढरी ओळखले जाते. मनापासून योग्य तो अभ्यास केल्यास तुम्ही ठरवलेल्या ध्येय पासून कोणीही रोखू शकणार नाही. सेलू तालुक्यातील यावर्षी ब-या पैकी युवक व युवती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पास होऊन अधिकारी झाले आहेत. आता मला वाटते आपल्या जिल्हात व सेलू तालुक्यात जिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी निर्माण व्हावे ही ईच्छा. तालुक्यातून अनेक गरीब विद्यार्थ्यानी परिस्थितीवर मात करून जे यश संपादन केले आहे ते खूपच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागात राहून कुठल्याही भौतिक सुविधा नसताना व कुठल्याही बाहेरील शिकवण्या नसताना केवळ शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जे उत्तुंग यश मिळवले त्या बद्दल विद्यार्थ्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. मलाविश्वास आहे कि, हे सर्व विद्यार्थी भविष्यात एक चांगली पिढी घडवतील. सर्वांना पुढील शैक्षणिक आयुष्यास मनःपूर्वक शुभेच्छा!
यावेळी भरत दौंडकर यांनी आपल्या शैलीत विद्यार्थ्याचा गुणगौरव केला तसेच कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मने जिंकली. विद्यार्थ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत विद्यार्थ्यांनी शिकून खूप मोठे व्हावे असा आशावाद व्यक्त केला...
कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सभापती अशोक काकडे, जि.प सदस्य राजेंद्र लहाने,उपजिल्हाध्यक्ष विनायक पावडे, समिती सभापती पुरुषोत्तम पावडे,तालुका अध्यक्ष माऊली ताठे,अॅड. बालासाहेब रोडगे,तालुका कार्यध्यक्ष सुधाकार रोकडे,शहराध्यक्ष भारत इंद्रोके,अजय डासाळकर,आजू कारी,गौस लाला भाई व विद्यार्थी-पालक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें