सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सतीश ताठे,संजय मुरकुटे,सखाराम अहिरे,मानसिंग राजपूत,संजय आरके,संजय फरकाडे,मनोहर आरके,राजेश्वर आरके,आप्पासाहेब हावळे,अमोल कुदळ,फईम पठाण,रवि आरके,पंकज दांडगे,अरविंद दांडगे, शिवदास दणके,जगन्नाथ कुदळ,आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें