जोगवाडा पशुवैद्यकीय दवाखान्याचा भोंगळ कारभार उघड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 8 जुलाई 2018

जोगवाडा पशुवैद्यकीय दवाखान्याचा भोंगळ कारभार उघड.


दवाखान्यासह, शासनाची देखील केली जातेय दिशाभूल...

चारठाणा( प्रभाकर कुर्हे )

जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथे पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पशुधन पर्यवेक्षक नसल्याने शेतकरी व पशुपालकांची प्रचंड गैरसोय होत आहे.. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे  जनावरांना शासनाकडून विविध  लसीकरणाची मोहिम राबवण्यात येते, मात्र जोगवाडा पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक नसल्याने या दवाखदवाखान्यातीलय सर्व कामे खोळंबली आहेत...या दवाखान्या अंतर्गत सोस, सोनापूर,जोगवाडा,भांबरी, माणकेश्वर, पांढरगळा, गारखेडा, रायखेडा, अशा एकूण नऊ गावांचा समावेश होत होत असून या गावातील पशुपालकांना व शेतकऱ्यांना आपली जनावरे ही पशुवैद्यकीय दवाखान्यात चे दरवाजे बघूनच परत न्यावी लागत आहेत..... प्रत्यक्षात मात्र प्रत्यक्षदर्शी पाहणी केली असता ही बाब वेगळीच असल्याचे निदर्शनास आले..  या दवाखान्यात 7 जून रोजी श्रीमती.कावळे व्ही.यु.यांची पशुधन पर्यवेक्षक पदी   नियुक्ती करण्यात आल्याचे उघड झाले आहे.. मात्र आज एक महिना उलटूनही पशुधन पर्यवेक्षक दवाखान्यात हजर झालेले नाहीत...   यापेक्षा ही  आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की दवाखान्यात प्रत्यक्ष हजेरी रजिस्टर वर मात्र त्या दि.07 जुन ते 25 जुन या तारखेपर्यंत त्या उपस्थित असल्याचे दाखवण्यात आलेले आहे.. नियुक्ती झाल्यानंतर एक-दोन दिवस ते दवाखान्यात आल्या होत्या मात्र दोन दिवसाच्या कामानंतर पंधरा दिवसाच्या हजेरी कशी भरून भरली जाऊ शकते दवाखान्यातून शिकवण मिळत आहे.. यातूनच गावकऱ्यांची,व प्रशासनाची दिशाभूल कशी केली जात आहे हे स्पष्ट झाले आहे..
*मी गेल्या दहा दिवसापासून या दवाखान्यामध्ये जनावरांच्या उपचारासाठी चकरा मारत आहे,मात्र प्रत्येक वेळी दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक नसल्याचे कारण दाखवून मला परत केले जात होते... प्रत्येक वेळी डॉक्टर आज येतील उद्या येतील एवढे सांगून मला परत पाठवले जात आहे प्रत्यक्षदर्शीनी मात्र आमची व प्रशासनाची दिशाभूल करणारी बाब उघड झाल्यानंतर यावर प्रशासन कार्यवाही करणार की या गोष्टीला दुजोरा देणार याकडे लक्ष लागून आहे....*
शरद मस्के....पशुपालक तथा पंचायत समिती सदस्य जिंतुर..

*पशुधन पर्यवेक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर मी पशुवैद्यकीय दवाखाना जोगवाडा येथे दोन वेळेस भेट देऊन दिली.. मात्र दोनही वेळेस पशुधन पर्यवेक्षक उपस्थित नव्हत्या..मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न ही केला होता मात्र संपर्क झाला नव्हता... त्या उपस्थित नसताना देखील हजेरी पटावर त्या उपस्थित नसताना देखील हजेरी पटावर त्या उपस्थित नसताना देखील हजेरी पटावर सह्या कशा झाल्या हा प्रश्न गंभीर आहे.....* डॉक्टर-- प्रकाश आकोशे..... पशुधन विकास अधिकारी.. पंचायत समिती जिंतुर...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें