मदतिसाठि गेलेला मदतनिसाचाही म्रुत्यु.
चारठाणा ( प्रभाकर कुर्हे ) जिंतुर तालुक्यातील चारठाणा येथील गॅस एजन्सी जवळ खताच्या ट्रक ला विजेच्या लोमकाळत्या मुख्य तारेचा स्पर्श झाल्याने ट्रक मध्ये विज प्रवाह उतरून चालकाचा जागेवरच मुत्यु झाला तर मदत करणारण्या साठी धावलेल्या तरूणाला देखिल शाँक बसल्याने उपचारा दरम्यान त्याचा मुत्यु झाल्याची घटना शनिवार ७ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चारठाणा येथे घडलीया बाबत आधिकारी माहिती अशी की चारठाणा येथील एका कृषी केंद्रावर खत खाली करून ट्रक क्रमांक एम.एच.२२ ए.एन.९३९६ हा परभणी कडे जात असताना चारठाणा येथील गॅस एजन्सी जवळील विजेच्या मुख्य वाहिनीच्या तार लोमकाळत्या आवस्थेत आहेत खताचा रिकामा ट्रक थेथुन जात आसतांना लोमकाळत्या तारांचा ट्रक ला स्पर्श झाल्याने ट्रक चालक त्रिंबक मुंजाजी काचगुंडे वय ३५ वर्ष रा. कुभकर्ण टाळकी ता.परभणी यांना जबर विजेचा धक्का बसल्याने जागेवरच मृत्यु झाला तर ट्रक चालकाला मदत करण्यासाठी धावुन गेलेला चारठाणा येथील कुष्णा संभाआप्पा गजमल वय २७ वर्ष या तरूणाचा जिंतुर येथे उपचारा दरम्यान मुत्यु झाला.घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार पांडे व कर्मचारी वर्गानी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
*मदतीला धावणारा क्रुष्णा उर्फ क्रिष गेल्याने हळहळ* चारठाणा येथील कृष्णा गजमल हा तरूण कोणाच्या सुख दुःखात नेहमी अग्रेसर असायचा या दरम्यान सदर तरूण या रस्यावरून घराकडे येत असतांना त्याच्या निदर्शास सदर घटना दिसल्याने त्याने स्वतःची पर्वा नकरता चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नांत स्वाताःचा जिव गमावून बसल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
*लोबकाळलेल्या ताराने घेतला दोघाचादोघांचा बळी*
जिंतुर तालुक्यातील चारठाणा येथील विज तारा कालबाह्य झाले असुन आनेक प्रभागात तारे लोबकाळली आहेत .गॅस एजन्सी जवळील देखिल मुख्य तार लोबकाळलेली असल्याने ट्रक ला स्पर्श होऊन दोघांचा बळी गेल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
*कंत्राटदारावर कार्यवाहि व्हायला हवी ....*
महावितरणचे नविन लाईन टाकणे,विद्युत रोहित्र बसवने सह ईतर कामे करण्या साठि विद्युत वितरण कंपणीच्या आधिकारी वर्गतिल जवळचा खाजगी कंत्राटदार नेमुन काम दिले जाते तेव्हा त्याला कोणताहि आनुभव नसल्याने कोणतेहि रोजदार लावुन काम आटोपले जाते परिणामि तारा लोमकाळत राहणे , चिमण्या व्यवस्थित न बसवल्याने त्या फुटने ,पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरणे, पोल पडणे अश्या घटना घडतात आणी प्राण हाणी होते हे सर्व निक्रुष्ट कामे केल्याने घडते या घटणेतहि तारा लोमकाळत्या आसल्याने व सदर तारांना रोड क्रासचि तारा खालिल संरक्षण जाळी न बसवल्याने घटणा झाली त्या मुळे कामात कसुर केल्या प्रकरणी सदर काम केलेल्या कंत्राटदारावर कार्यवाहि व्हायला हवी.
*ग्राम पंचायतने ठोस पाउले उचलण्याचि गरज..*
चारठाणा येथिल संपुर्ण गावातिल विद्युत तारा आत्यंत जुन्या झाल्या आसुन गावात ताराला तारा लागणे , तारा लोमकाळत आसल्याने साध्या जिपला सुध्दा तारा स्पर्श करणे ,तारा तुटणे , गावातिल बहुतांश पोलहि गंज खाल्याने बदलण्याच्या स्थितित आहेत आणी ही प्रकरणे रोज घडत आहेत आज आशाच तारा लोमकाळत आसल्यानेच दोन बळी गेले बर्याच तारा रहिवाश्यांच्या घरावरुणहि गेलेल्या आहेत त्या मुळे मोठी प्राणहाणीचि घटणा नाकारता येत नाही त्या मुळे ग्राम पंचायतने वेळिच ठोस पाउल उचलून सदर विद्युत तारा,विद्युत रोहित्र ,विद्युत पोलचि दुरुस्ती करायला हवी.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें