कोपरगांव तालुक्यातील सामाजिक वणीकरण विभागाचा अजब कारभार . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 15 जुलाई 2018

कोपरगांव तालुक्यातील सामाजिक वणीकरण विभागाचा अजब कारभार .



शिर्डी प्रतिनिधी
 राज्य शासनाच्या १३कोटी वृक्ष लागवडीच्या प्रकल्पास मोठा प्रतिसाद मिळत आहे वृक्ष संवर्धन हि काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन शासनाने राज्यात १३कोटी वृक्ष लागवडीचा घेतलेला निर्णय महत्वाचा असुन सदर वृक्ष हे गावात रस्तेच्या कडेला.डोंगर.उंच कडे पठार या ठिकाणी लावण्याचा निर्णय शासनाचा असतांना मात्र कोपरंगाव येथिल सामाजिक वणीकरण विभागा मार्फत लावलेल्या झाडांन पैंकी डाऊच.घारी.हिंगणीगाव परीसरातील रोडवरती तुरळक प्रमाणात वरचेवर वृक्ष लागवडी केल्याचे दिसून आले असुन तर काहि प्रमाणात रस्तेच्या कडेला वृक्ष लावलीच गेली नाही शासनाच्या नियमा प्रमाणे वृक्ष लागवडी करतांना काही ठिकाणी दोन ते तीन फुट खड्डा करुन व त्याच खड्डयात पोषक असे खत टाकुन  वृक्ष लागवडी करुन त्या खड्डयाभवती पाणी साचले जाईल असे मातीचे आळे करुन पाणी टाकण्याची काळजी घेऊन वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली जाते पण कोपरंगाव सामाजिक वणीकरण  विभागाच्या मार्फत तुरळक ठिकाणी खड्डा न घेता वरचेवर वृक्ष लागवडी करुन त्या वृक्षास पाणी न मिळाल्याने अनेक वृक्ष जळुन गेले या मध्ये सामाजिक वणीकरण विभागाचे उदासिन धोरण दिसुन येत आहे शासनाच्या या वृक्ष लागवडीचे अनुदान लाटण्यासाठी वणीकरण विभागाकडुन हे काम केले गेले असल्याचा आरोप येथिल नागरीकांनी केला असुन या बाबद वरीष्ठ अधिकारी मार्फत या कामाची चौकशी करावी अशी मागणी काहि सुज्ञ नागरीकांनी केली आहे व लवकरच या मागणीचे निवेदन मुबंई मंत्रालय येथे देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें