जिंतूर शहरातील भाजी मंडई भागातील व्यायाम शाळेत बाप-लेकांनी संगनमत करून व्यायाम शाळेतील 52 हजार रुपयांच्या साहित्याची धाडसी चोरी केल्याप्रकरणी शनिवार 14 जुलै रोजी पोलीसात बापासह तीन लेकांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील घटनेविषयी सविस्तर वृत्त असे की, शहरातील आवेस खान हे मागील दहा वर्षांपासून भाजी मंडईमध्ये व्यायाम शाळा चालवतात क 5 जुलै रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास शेख सलीम, शेख इब्राहिम, शेख इस्माईल, शेख जावेद या चार बाप लोकांनी संगनमत करून सदरील व्यायाम शाळेची भिंत ट्रॅक्टरने पडून व्यायाम शाळेत अनधिकृत प्रवेश करून व्यायाम शाळेतील जुन्या वापरातील 52 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेल्याची तक्रार पोलीसात 5 जुलै रोजी दिली होती या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी करून शनिवार 14 जुलै रोजी आवेस खान यांच्या फिर्यादीवरून शेख सलीम, शेख इब्राहिम, शेख इस्माईल, शेख जावेद या चार बाप लेकांविरुद्ध कलम 457, 380 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें