सोनपेठ(राजेश खेडकर) दि. २३जुलै २०१८
येथील व्हिजन पब्लिक स्कूल येथे युवक कल्याण व क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि तालुका शिक्षण समिती यांच्या संयोजनाने क्रीडा स्पर्धेत कबड्डी (मुली) या खेळापासून सुरुवात झाली.
उद्घाटन प्रसंगी सोनपेठ येथील राष्ट्रीय खेळाडू दत्तराव कदम(काका) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सुमित लांडे (तालुका क्रीडा प्रमुख), विनोद पवार, प्रदीप गायकवाड, पत्रकार किरण स्वामी, राधेश्याम वर्मा, मारुती चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच क्रीडाशिक्षक रवीकुमार स्वामी, जमशेटे, आत्राम, मोरे, पवार, प्रशांत पारेकर, शिंदे, देशपांडे, विठ्ठल, सुरज गायकवाड, निर्मळ, आळसे, प्राचार्य अजय सर (जिजामाता विद्यालय सोनपेठ), इत्यादी क्रीडा शिक्षक व त्यांच्या संघाचे स्वागत करण्यात आले.
स्पर्धेच्या सुरुवातीला महालिंगेश्वर विद्यालय विरुद्ध जिल्हा परिषद शेळगाव या संघापासून सुरुवात झाली स्पर्धेत एकूण १८ संघ सहभागी झाले होते यामध्ये वयोगट १४ मध्ये जिजामाता पब्लिक स्कूल यांनी प्रथम स्थान प्राप्त केले. व तसेच १७ वयोगटात महालिंगेश्वर विद्यालय सोनपेठ यांनी प्रथम स्थान प्राप्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान घाटूळ यांनी केले. व आभार प्रदर्शन पप्पू पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे प्राचार्य डॉ.दुकळे सर, उपप्राचार्य श्रवण कुमार सर तसेच शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें