माजी मुख्यमंञी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त सोनपेठ येथे उद्या भव्य सर्वरोग निदान शिबीर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 21 जुलाई 2018

माजी मुख्यमंञी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त सोनपेठ येथे उद्या भव्य सर्वरोग निदान शिबीर.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि. २१जुलै २०१८

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंञी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त दि.२२ जुलै रविवार रोजी शहरातील कै.वसंतराव नाईक सांस्कृतिक सभागृह सोनखेड तांडा येथे वसंतराव नाईक सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
    या निमित्त सकाळी ९.३० वाजता मोफत  सर्वरोग निदान व उपचार शिबीर, वृक्षारोपण, शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. मोहनराव फड हे राहणार असुन उद्घाटक म्हणुन परभणी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. उज्वलाताई राठोड, तर सर्वरोग निदान शिबीराचे उद्घाटन सौ.मेघा  मोहनराव फड यांच्या हस्ते होणार असुन  प्रमुख उपस्थीती म्हणुन नगराध्यक्षा  सौ.जिजाबाई राठोड, माजी नगराध्यक्ष तथा न.प.गटनेते चंद्रकांत राठोड, प.स.उपसभापती सौ. मिराताई जाधव, प्रमुख पाहूणे म्हणुन प्राचार्य बबनराव पवार, नगरसेवक रमाकांत राठोड, निलेश राठोड, तालुका आरोग्य अधिकारी सुभाष पवार, विशाल राठोड, गोपीनाथ पवार, सिताराम पवार आदी उपस्थीत राहणार आहेत. या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी व बंजारा समाज बांधवानी  उपस्थीत रहावे असे आवाहन कै. वसंतराव नाईक सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें