सोनपेठ (राजेश खेडकर) दि. १९जुलै २०१८
मराठा समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यासंदर्भात परळी वैजनाथ जि.बिड येथे बुधवारी आयोजित ठोक मोर्चानंतर धरणे आंदोलन सुरु आहे. आरक्षण व इतर मागण्यांसाठी या आंदोलकांना पाठिंबा दर्शवत सोनपेठ येथील शिवाजी चौक येथे मराठा समाजाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यानंतर आंदोलकांनी तहसीलदार जिवराज डापकर यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनाववर नगरसेवक अॅड.श्रीकांत विटेकर, नारायण रोडे, आजित देशमुख, आमोल गांगर्डे, संतोष गव्हाने, किशोर कनसे, गोकुळ आरबाड, बालासाहेब इंगोले, राजेभाऊ हुंबे, महेश परांडे, अभिजित लोमटे,अर्जुन इंगळे, अनिल झिरपे, शिवराज जोगदंड आदींसह इतर अनेक आंदोलकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें