तालुक्यातील चिकलठाणा खु.
येथील एका शेतकच्यासह १३ वर्षाच्या
मुलाने नापिकीमुळे कंटाळून आत्महत्या
केली. यामध्ये वडिलांचे निधन झाले तर
१३ वर्षांचा मुलगा मात्र उपचारानंतर
बचावला आहे. ही घटना ८ जुले रोजी
दुपारी १ ते ५ च्या दरम्यान घडली. मयत
राजेभाऊ लोखंडे यांच्यावर सोमवार ८
जुलै रोजी सकाळी १० वाजता।
अंत्यसंस्कार करण्यात आले.
तालुक्यातील चिकलठाणा खु,
येथील शेतकरी राजेभाऊ नामदेव लोखंडे
(वय ३६) यांची गावाकडे तीन एकर
शेती आहे. सततच्या नापिकीमुळे तसेच
सेलूच्या भारतीय स्टेट बैंक व मोरेगाव
येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे थकित कर्ज hu un
कसे फेडावे या विवंचनेत असतानाच
राजेभाऊ नामदेव लोखंडे यांनी राहत्या
घरी विषारी औषध प्राशन केले. वडिलांनी
औषध घेतल्यामुळे १३ वर्षांचा मुलगा
अतुल राजेभाऊ लोखंडे यानेही विषारी
औषध प्राशन केले. या दोघा पिता-पुत्रांना
तत्काळ सेलू येथील उपजिल्हा
रुग्णालयात दाखल केले असता वडील
राजाभाऊ लोखंडे यांना डॉक्टरांनी मृत
घोषित केले. तर मुलगा अतुल याची
उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें