सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१६जुलै २०१८
क्रिडा व यूवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पूणे, जिल्हा क्रिडा परिषद परभणी आणि तालूका क्रिडा समिती सोनपेठव्दारा होनाऱ्या तालूकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा आयोजना संबंधित सोनपेठ तालूक्यातील क्रिडा शिक्षकांची बैठक तालूका क्रिडाधिकारी सुमित लांडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद प्रशाळेत नुकतीच संपन्न झाली. यावेळी तालूकास्तर दहा क्रिडा प्रकाराचे नियोजन करण्यात आले. या स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी असून १४, १७ व १९ वर्ष वयोगटातील मूला/मूलींंचा यात समावेश असनार आहे.
सदरील स्पर्धा दि. २४ जूलै ते ११ ऑगस्ट २०१८ या कालावधीत घेन्याचा निर्णय या बैठकीत घेन्यात आला. त्यानुसार स्पर्धेचे वेळापत्रक व ठिकाण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले.
दि.२४जुलै २०१८ रोजी मूलांची कब्बड्डी जिजामाता विद्यालय सोनपेठ येथे
दि.२५जुलै रोजी मूलींची कब्बड्डी व्हीजन पब्लिक स्कूल सोनपेठ येथे
दि.२६जुलै योग जि.प.प्रशाला सोनपेठ येथे
दि.२७जुलै मुलांचा खो-खो कै.रमेश वरपुडकर कनिष्ठ महाविद्यालय सोनपेठ येथे
दि.२८जुलै मुलींचा खो-खो व्हीजन पब्लिक स्कूल सोनपेठ येथे
दि.३०जुलै कूस्ती मूले/मूली कै.बाजीराव देशमूख विद्यालय शेळगाव येथे
दि.०२अॉगस्ट क्रिकेट मूले/मूली केदारेश्वर विद्यामंदीर उखळी येथे
दि.०४अॉगस्ट बूध्दीबळ मूले/मूली एल.आर.के.स्कूल सोनपेठ येथे
दि.०७अॉगस्ट हॉलीबॉल मूले/मूली सद्गूरु संचारेश्वर विद्यालय नैकौटा येथे
दि.०८अॉगस्ट कराटे-तायक्वांदो मूले/मूली जि.प.प्रशाला सोनपेठ येथे
स्पर्धांचा समारोप दि.१० व ११अॉगस्ट रोजी मैदानी स्पर्धा मूल/मूली माधवास्रम विद्यालय खडका येथे होणार असून याच ठिकाणी स्पर्धांचा समारोप होनार आहे.
स्पर्धा नियोजन/आयोजन बैठकीस सोनपेठ तालूका शा.शि.संघटना अध्यक्ष गूलाबराव कदम, सचिव प्रशांत पारेकर, सूरज गायकवाड, रविकूमार स्वामी, सूजीत माळी, कैलास आरबाड, विठ्ठल राठोड, प्रल्हाद आळसे, विलास मुंडे आदी उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी खेळांडू करिता विहीत नमूण्यातील ओळख पञ व आधार कार्डाची सत्यप्रत बंधनकारक करण्यात आली आहे. परिस्थितीनुसार स्पर्धा नियोजनात तालूका क्रिडा संयोजक बदल करू शकतात. यासाठी संयोजकांच्या संपर्कात राहण्याचे व स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन जिवराज डापकर, तहसिलदार सोनपेठ, शौकत पठाण गटशिक्षणाधिकारी सोनपेठ, सुमित लांडे तालूका क्रिडा संयोजक सोनपेठ यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें