प्रधानमंत्री पिक विमा योजना प्रचारासाठ फिरत्या वाहनाचा शुभारंभ. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 18 जुलाई 2018

प्रधानमंत्री पिक विमा योजना प्रचारासाठ फिरत्या वाहनाचा शुभारंभ.



सोनपेठ/परभणी(राजेश खेडकर) दि.१७ जुलै २०१८
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार वाहनाचा शुभारंभ आज निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या योजनेच्या फिरत्या वाहनाच्या शुभारंभ प्रसंगी विमा कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक अभिजित नांदोडे, नवी दिल्ली, जिल्हा समन्वयक दिपक कांबळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, विमा कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यातील खरीप पिकासाठी विमा योजना राबविण्यात येत आहे. योजनेतर्गत सहभागी शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील महसूल मंडळामध्ये नैसर्गिक व अन्य कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्यात येईल. फिरत्या वाहनाद्वारे इफको-टोकियो जनरल इन्शोरेन्स कंपनीमार्फत बिगर कर्जदार शेतकऱ्यांना २४ जुलै २०१८ पर्यंत योजनेत सहभागी होण्यासाठी माहिती दिली जात आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये सदर वाहन जाणार असून शेतकऱ्यांनी जवळच्या सामान्य सेवा केंद्र, संबंधित बँका, जिल्हा सहकारी बँकामध्ये जावून योजनेतसाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येईल. असे श्री.नांदोडे यांनी सांगितले.
विमा कंपनीच्या वतीने प्रत्येक वाहनासोबत तालुक्यातील समन्वयक ध्वनीफिती व माहिती पत्रकाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवणार आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें