वृक्ष लागवड हि लोक चळवळ होण्याची गरज=पालकमंत्री बबनराव लोणीकर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 1 जुलाई 2018

वृक्ष लागवड हि लोक चळवळ होण्याची गरज=पालकमंत्री बबनराव लोणीकर.



मंठा प्रतिनिधी
आज जालना जिल्ह्यात ३६ लक्ष तर संपूर्ण महाराष्ट्रात १३ कोटी वृक्ष लागवड
करण्याचा महाराष्ट्र सरकारचा संकल्प  असून त्यासाठी वृक्ष लागवड हि लोक
चळवळ होण्याची गरज राज्याचे पाणीपूरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना
जिल्ह्याचे पालकमंत्री ना बबनराव लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केली.  मंठा
येथे आज १ जुलै  स्व वसंतराव नाईक यांच्या जयंती तथा महाराष्ट्र कृषी दिन
 निमित्त आयोजित वृक्ष दिंडी व वृक्ष लागवड कार्यक्रमानिमित्त आयोजित
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालकमंत्री लोणीकर  होते

यावेळी युवानेते राहुल लोणीकर,जेष्ठ नेते भुजंगराव गोरे, तालुकाध्यक्ष
गणेशराव खवणे, सभापती संदीप गोरे,पं स सभापती स्मिता म्हस्के, उपसभापती
राजेश मोरे, कल्याण खरात, पंजाब बोराडे, शिवदास हनवते, मधुकर खंदारे,
कैलास बोराडे, नागेश घारे, संभाजी खंदारे, नाथराव काकडे, बी डी पवार,
दत्तराव कांगणे, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, विभागीय वन अधिकारी
जगत, नायबतहसीलदार कोटुरकर, गट विकास अधिकारी झरे, वन अधिकरी तांबे,
राहतवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

यावेळी सर्वप्रथम स्व वसंतराव नाईक साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करण्यात आला. राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा महाराष्ट्र शासनाचा
संकल्प असून तो संकल्प आपण सर्वांच्या सहकार्याने पूर्णत्वास जाणार
असल्याचे मत यावेळी लोणीकर यांनी व्यक्त केले. वृक्ष लागवड करण्याबरोबर
त्या वृक्षांची जोपासना करणे आवश्यक असून त्यासाठी प्रत्येकाने अत्यंत
जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी लोणीकर यांनी व्यक्त
केले. सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालये, संस्था, सर्व शाळा यांनी या
कामात हिरिरीने भाग घेत आपण समाजाचं देणं लागतो हि भावना जोपासावी. असे
यावेळी लोणीकर पुढे बोलताना म्हणाले. आज लावण्यात येणाऱ्या सर्व झाडांचे
मूल्यांकन केले जाणार असून सर्व संबंधित लोकांनी काळजी घ्यावी व सर्व
वृक्षांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारावी असेही यावेळी लोणीकर
म्हणाले.

===============================================
लोकप्रतिनिधीसह अधिकरी कर्मचारी यांनी वृक्ष लागवड व त्यांच्या संगोपनाची
जबाबदारी स्वीकारावी. --- पालकमंत्री लोणीकर
प्रत्येक लोकप्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी यांनी पुढाकार घेत वृक्ष लागवड
करावी तसेच त्यांचे संगोपन करावे असे मत यावेळी लोणीकर यांनी व्यक्त
केले. आपण सर्वानी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतल्यास समाजासमोर एक नवा
आदर्श निर्माण होईल, असं मत यावेळी लोणीकर यांनी व्यक्त केले.

===============================================
आज मंठा येथे स्व वसंतराव नाईक यांची जयंती निमित्त  वृक्ष दिंडीचे आयोजन
करण्यात आले होते, विडोली फाटा ते रेणुका माता मंदिरापर्यंत वृक्ष दिंडी
काढण्यात आली. यामध्ये वारकरी शिक्षण संस्थेचे बाळ वारकरी , जिल्हा
परिषदेच्या सर्व शाळा, रेणुका विद्यामंदिर, कस्तुरबा बालिका विद्यालयातील
सर्व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यावेळी पालखीमध्ये वृक्ष ठेऊन
वुक्ष दिंडी काढण्यात आली. सोबत विविध ग्रामपंचायतींना वाटप करण्यात
आलेल्या वृक्षांचे १५ पेक्षा जास्त  ट्रॅक्टर देखील सहभागी झाले होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती, मंठा शहर मुख्य रस्ता दुभाजक, नवीन
न्यायालय इमारत, रेणुका माता मंदिर परिसर, तहसील कार्यालय परिसर, पंचायत
समिती परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिक,
विद्यार्थी बांधवानी वृक्ष लागवड व त्याच्या संगोपनाचा संकल्प केला.
=================================================
यावेळी विठ्ठलराव काळे, उद्धवराव गोंडगे, सुभाष राठोड, माउली वायाळ, सतीश
निर्वळ, संजय गायकवाड, निवास देशमुख, नर्सिंग राठोड, विलास
घोडके,दारासिंग चव्हाण, पंजाब पुणेकर, अनिल खंदारे, माउली गोंडगे,
बाळासाहेब तौर, नितीन सरकटे,गणेश चव्हाळ , इसम पटेल, बाजीराव बोराडे,
राजेभाऊ खराबे, सुभाष बागल, गजानन शिंदे, श्रीराम जाधव, अशोकराव
सोनटक्के, रावसाहेब बाहेकर, सुरेश बाहेकर, नीलकंठ मोरे, तान्हाजी शेंडगे,
राम चव्हाण,   अंसाबाई राठोड,  अशोक राठोड, नारायण बागल, भीमराव राठोड,
आबासाहेब सरकटे, त्र्यंबक हजारे, गीताराम हजारे, नरेंद्र ताठे, यांच्या श
पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें