तात्काळ कर्जपुरवठा करण्यासंदर्भात बँक अधिकाऱ्यांना सुचना ;
सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.०३ ) - सिल्लोड येथील बँक ऑफ महाराष्ट्रसह जिल्हा मध्यवर्ती बँक आदी बँकांना भेट देऊन नागरिकांच्या नवीन कर्ज व पीक विम्यासह विविध अडी - अडचणी जाणून घेत बँकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरीत तुम्ही तरी गोरगरिबांची अडवणूक - पिळवणूक करु नका, शेतकरी अगोदरच कर्जबाजारीपणामुळे हतबल झालेला असुन शेतक-यांना तात्काळ कर्जपुरवठा करण्यासंदर्भात नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी बँक अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत .
सिल्लोड येथील बँक ऑफ महाराष्ट्र , जिल्हा मध्यवर्ती बँकेसह ईतर बँकांना नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना कर्ज वितरणाच्या कामात दिरंगाई होणार नाही याची कटाक्षेने काळजी घ्यावी तसेच शेतकऱ्यांना त्रास होईल असे वर्तन बँकांकडून होणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजेत असे सुचवीत शेतकऱ्यांना तात्काळ कर्जपुरवठा करण्यासंदर्भात बँकांच्या संबंधितांना सुचना दिल्या तसेच पिककर्जा करीता बँकांमध्ये खुपच गर्दी होत असुन लाभधारकांना रांगेत ताटकाळत उभे राहावे लागत असुन शेतक-यांना वेठीस धरण्याचे काम करु नका असे आवर्जून सांगत नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
यावेळी शेतकरी - शेतमजुर - नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें